स्टंट करताना हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूजचा अपघात, 20 कोटी पाण्यात !

पोलिसनामा ऑनलाईन – धोकादायक स्टंट करताना हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजचा अपघात झाला आहे. सुदैवाने अपघातात त्याला फारशी दुखापत झाली नाही. परंतु कोट्यवधी रुपयांचा सेट मात्र जळून खाक झाला आहे. परिणामी लॉकडाउनच्या काळात निर्मात्यांना मोठे नुकसान झाले आहे.

धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्ससाठी टॉम क्रूज ओळखला जातो. ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपटमालिकेत त्याने केलेले स्टंट आश्चर्यचकित होते. ‘मिशन इम्पॉसिबल 7’ हा आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथे सुरु आहे. एका सीनमध्ये टॉमला बाईक चालवत एका इमारतीवरुन दुसर्‍या इमारतीवर उडी मारायची होती. हा स्टंट जवळपास 30 फूट उंचीवरुन केला जात होता. स्टंट करताना टॉमचा तोल आणि त्याच्या बाईकचा अपघात झाला. इतक्या उंचीवरुन चालती बाईक खाली पडल्यामुळे पेट्रोलची टाकी फुटली. त्यामुळे त्या ठिकाणी आग लागली. या आगीमुळे जवळपास 25 टक्के सेट जळून खाक झाला. या अपघातात एक महागडा कॅमेरादेखील फुटला आहे. परिणामी निर्मात्यांना जवळपास 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.