Coronavirus : अभिनेते टॉम हॅक्स आणि पत्नी झाले ‘कोरोना’चे ‘शिकार’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था  –  हॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते आणि दोन वेळा आॅस्कर पुरस्कार विजेते टॉम हॅक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन हे दोघेही कोरोना विषाणुचे शिकार झाले आहेत. स्वत: टॉम याने ट्वीट करुन ही माहिती दिली.  टॉम याने ट्वीट करुन सांगितले आहे की, आम्ही सध्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहोत. ऑस्ट्रेलियात असताना आम्हाला थोडा ताप आला होता.

थंडीही वाजत होती. आम्ही कोरोना व्हायरसची टेस्ट केली. त्यात टेस्ट सकारात्मक आल्याने आम्हाला वैद्यकीय अधिकार्‍यांनी सुरक्षेच्या कारणामुळे आम्हाला वेगळे करुन ठेवणार आहे. टॉमच्या ट्वीटनंतर इंग्लडचे आरोग्य मंत्री नादिन डोरिस यांनी टॉम यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोना व्हायरस हा जगातील ११४ देशात पसरला असून आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.