Tomato Fever In India | वेगाने पसरत आहे Tomato Fever, जाणून घ्या लक्षणे? या लोकांना आहे धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – What Is Tomato Fever | जगासोबतच भारतही गेल्या काही वर्षांपासून कोरोना महामारीशी लढा देत आहे. कोरोना महामारीनंतर जगभरात मंकीपॉक्सने चिंता वाढवली असून आता आणखी एका नवीन आजाराने दार ठोठावले आहे. (Tomato Fever In India)

 

हँड फूट माउथ डिसीज (HFMD), ज्याला टोमॅटो फिव्हर (Tomato fever) असेही म्हणतात, हा आरोग्य तज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण तो मुलांमध्ये झपाट्याने पसरतो. लॅन्सेट रेस्पिरेटरी जर्नलमधील अभ्यासानुसार, केरळमध्ये 6 मे 2022 रोजी टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा ताप एक ते पाच वर्षे वयोगटातील मुले आणि इम्युनिटी कमकुवत असलेल्या प्रौढांना होतो. (Tomato Fever In India)

 

लॅन्सेट अभ्यासात असे म्हटले आहे की, आपण कोविड-19 च्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा सामना करत आहोत, अशावेळी टोमॅटो फ्लू म्हणून ओळखला जाणारा एक नवीन विषाणू भारतातील केरळ राज्यात 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळून आला आहे. याची आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. टोमॅटोच्या तापापासून दूर राहण्यासाठी टोमॅटो फ्लू किंवा टोमॅटो फिव्हर म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे? त्याचा प्रसार कसा होतो? लक्षणे कोणती आहेत आणि तो कसे टाळता येईल? ते जाणून घेवूयात…

 

– टोमॅटो फ्लू म्हणजे काय? (What is Tomato Flu)
इंडियाटूडेच्या मते, लॅन्सेट अभ्यासात असे म्हटले आहे की टोमॅटो फ्लूची लक्षणे कोविड-19 व्हायरससारखीच आहेत. परंतु हा विषाणू SARS-CoV-2 शी संबंधित नाही, तो पूर्णपणे वेगळा आहे. चिकुनगुनिया किंवा डेंग्यू तापानंतर मुलांमध्ये टोमॅटो फ्लू होऊ शकतो. या फ्लूचे नाव टोमॅटो फ्लू आहे कारण यामुळे संपूर्ण शरीरावर लाल आणि वेदनादायक फोड येतात. या फोडांचा आकार टोमॅटो एवढाही होऊ शकतो. (Tomato Fever In India)

– टोमॅटो फ्लूचा धोका कोणाला आहे? (Who is at risk of tomato flu?)
मुलांना टोमॅटो फ्लूचा धोका जास्त आहे. कारण या वयात विषाणूजन्य संसर्ग मुलांना लवकर होतो. पाच वर्षांखालील मुलांना या स्थितीचा सर्वाधिक फटका बसत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. विशेषतः टोमॅटो फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य असूनही जीवाला धोका नाही.

 

– टोमॅटो फ्लूची लक्षणे काय आहेत? (What are the symptoms)
Tomato फ्लू असलेल्या मुलांमध्ये दिसणारी प्राथमिक लक्षणे चिकुनगुनिया किंवा डेंग्यू तापासारखीच असतात. लक्षणांमध्ये उच्च ताप, चट्टे, सूजलेले सांधे, मळमळ, अतिसार, डिहायड्रेशन, तीव्र सांधेदुखी यांचा समावेश होतो. शरीर दुखणे, ताप आणि थकवा यांचाही समावेश आहे जी लक्षणे कोविड-19 रूग्णांनी अनुभवली आहेत. काही प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या त्वचेवर फोडांचा आकार खुप वाढला होता.

 

– टोमॅटो फ्लूची कारणे (Tomato flu causes)
Tomato फ्लूचे विशिष्ट कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अजूनही संशोधन करत आहेत, परंतु सध्या हा एक प्रकारचा विषाणू संसर्गाचा मानला जात आहे. काहींनी सुचवले आहे की  हा डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा दुष्परिणाम असू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याचा स्रोत एक व्हायरस आहे, परंतु त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही की तो कोणत्या व्हायरसमुळे पसरत आहे किंवा कोणत्या व्हायरसशी संबंधीत आहे.

– टोमॅटो फ्लूवरील उपचार (Tomato flu treatment)
Tomato फ्लूपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर स्वच्छ राहण्याचा सल्ला देतात. हा विषाणू पाच वर्षांखालील मुलांसाठी जास्त संवेदनशील मानला जात आहे.
मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.
लहान मुले किंवा मोठी माणसे ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांनी फोड फोडणे आणि खाजवणे टाळावे.
जास्त पाणी प्या. जर एखाद्याला कोणतीही लक्षणे दिसली तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला टोमॅटो फ्लू आहे.

 

Web Title :- Tomato Fever In India | tomato fever in india what is tomato flu causes symptoms risk and treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Healthy Fats | डायबिटीजमध्ये लाभदायक आहे ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या इतर हेल्दी फॅट्सचे लाभ

 

Tulsi che Fayde | ‘या’ 5 आजारांच्या उपचारात अतिशय प्रभावी आहेत तुळशीची पाने, शरीर बनवतात निरोगी

 

Weight Loss Drink | ‘या’ 2 वस्तू मिसळून बनवा स्पेशल हेल्दी ड्रिंक; वजन कमी करणे होईल अतिशय सोपे