Tomato Price Update | नेपाळचे टोमॅटो आल्याने खाली आला भाव, किरकोळ बाजारात इतके रुपये किलो झाली किंमत

नवी दिल्ली : Tomato Price Update | महागड्या टोमॅटोपासून लोकांना सातत्याने दिलासा मिळत आहे. सरकारने टोमॅटोची ४० रुपये किलोने विक्री केल्यानंतर किरकोळ बाजारातही आवक वाढल्याने भावात दिलासा मिळाला आहे. याचा परिणाम म्हणजे किरकोळ बाजारात भाव ५० ते ७० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. दरम्यान, सरकारकडून सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत दर सामान्य पातळीवर येत नाहीत, तोपर्यंत सवलतीच्या दराने टोमॅटोची विक्री (Tomato Price Update) सुरूच राहील (Tomato Price Hike).

२५० रुपये किलोवर पोहोचला दर
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे देशभरातील किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव २५० रुपये किलोवर पोहोचला होता. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग म्हणाले, सध्या देशभरातील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ५० ते ७० रुपये प्रतिकिलो आहेत. मध्य प्रदेशसारख्या राज्यात नवीन पिकांची आवक वाढल्याने भाव खाली येऊ लागले आहेत. (Tomato Price Update)

४० रुपये किलो दराने विक्री
सवलतीच्या दरात टोमॅटो विक्रीबाबत सचिव म्हणाले की, सरकार किरकोळ किमती सामान्य होईपर्यंत निवडक
राज्यांमध्ये सवलतीच्या दरात विक्री सुरू ठेवणार आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात किमती कमी झाल्यामुळे
सहकारी संस्था एनसीसीएफ आणि नाफेड यांनी २० ऑगस्टपासून ४० रुपये प्रति किलो या कमी दराने टोमॅटोची विक्री
सुरू केली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्याबरोबरच नेपाळमधून टोमॅटोची आयात केली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chia Seeds | आरोग्यासाठी अतिशय चमत्कारी हे छोटे-छोटे बी, अनेक मोठ्या आजारापासून करते सुटका, हैराण करतील हे ५ फायदे