टोमॅटोचे दर गगनाला भिडले, ‘जाणून घ्या’ महाराष्ट्र आणि दिल्लीतील भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांद्याच्या दरवाढीनंतर सध्या टोमॅटोचे दर चांगलेच वाढत आहेत नवी दिल्ली आणि महाराष्ट्रात सध्या टोमॅटोचा भाव 80 रुपए प्रति किलो वर येऊन पोहचला आहे. दिल्लीच्या निवडणुकांना जरी अजून वेळ असला तरी महाराष्ट्रात मात्र यावरून चांगलेच राजकारण तापू शकते. एक नजर टाकुयात टोमॅटोच्या वाढत्या दरावर.

दिल्ली आणि महाराष्ट्रातील टोमॅटोचे दर
महाराष्ट्रामध्ये सध्या टोमॅटोचा दर 80 रुपए प्रति किलो झाला आहे. त्यातच जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आहे त्यामुळेच सतत टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये टोमॅटोची किंमत 60 रुपए प्रति किलो पेक्षा अधिक आहे. गुरुवारी मदर डेअरीच्या आउटलेटवर टोमॅटोचे दर 62 रुपए प्रति किलो होते. तसेच टोमॅटोच्या स्थानिक बाजारातील होलसेल किमती 70 रुपए प्रति किलो आहेत.

शेतकऱ्यांना मात्र काहीच फायदा नाही
टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा होतात दिसत नाही. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये नेहमी 200 ते 300 पोती भरून टोमॅटो येत असे मात्र आता त्यांची संख्या कमी होऊन 100 ते 150 इतकी झाली आहे. ज्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे.भाजी विक्रेत्यांच्या मते पावसामुळे टोमॅटोच्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.

visit : policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like