वेदनेने त्रासलात ? मग ‘हे’ खा ; पेनकिलरला उत्तम पर्याय !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार टोमॅटोत वेदना दूर करण्याचे गुणधर्म आहेत. अ‍ॅस्पिरिन या पेनकिलरला टोमॅटो पर्याय होऊ शकतो. अ‍ॅस्पिरिन हे वेदना दूर करणारे आणि रक्त पातळ करणारे औषध आहे. टोमॅटोतही वेदना दूर करण्याचे आणि रक्ताला पातळ करण्याचे औषधी गुण असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

विशेष म्हणजे टोमॅटोच्या बियांपासून तयार केलेला रस हा रक्ताचा प्रवाह वाढवतो आणि रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. रोवेट संस्थानातील प्रो. सर असीम दत्त रॉय यांनी याबाबत संशोधन केले होते. या संशोधनातून हे पुढे आले आहे. युरोपियन युनियनच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या संशोधनाला मान्यता दिली आहे. या संशोधनाने जगभरातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे.

रक्त पातळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅस्पिरिनमुळे अल्सरसारख्या दुष्परिणामास सामोरे जावे लागते. शास्त्रज्ञ सांगतात, टोमॅटोचे साइड इफेक्ट नाहीत. टोमॅटो रस किंवा टोमॅटो खाल्ल्यानंतर तीनच तासांत त्याचा सकारात्मक परिणाम होऊ लागतो. टोमॅटो सूप किंवा टोमॅटो बियांचे जल अ‍ॅस्पिरिनला पर्याय आहे.