रोहित पवारांच्या मतदारसंघात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या पराभवासाठी भाजपकडून जोरदार व्यूहरचना सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या सकाळी 11 वाजता कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. पवार यांचा कसल्याही परिस्थितीत पराभव करायचाच, असा चंगच भाजपने बांधला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची कर्जत-जामखेडसह कोपरगाव, नेवासा मतदारसंघातही जाहीर सभा होणार आहे. नगर जिल्ह्यात बारा-शून्य करण्यासाठी भाजप व शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तशा घोषणाही वारंवार करण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काल बारा-शून्यची घोषणा केली होती.

कर्जत-जामखेड मतदारसंघात संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. पवार कुटुंबियांचे राजकीय वारसदार रोहित पवारही निवडणूक रिंगणात उभे असल्याने पार्थ पवार यांच्या पराभवाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या हालचाली सुरू आहेत.

visit : policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like