उद्या पुणे-मुबंई द्रुतगती मार्ग ४० मिनिटांसाठी बंद असणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

उद्या १२ ते १ च्या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिशेची मार्गिका लावण्यात येणार असून उद्या म्हणजेच गुरुवारी चाळीस मिनिटांसाठी वाहतूक बंद राहणार आहे. द्रुतगती मार्गावर सूचना फलक लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक वळवण्यात आली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी किंवा प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही.

[amazon_link asins=’8185240809,B07BJN8KQ7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2ce2f47-b0c4-11e8-8072-bfa44cc66793′]

हा बंद फक्त गुरुवारी एकदाच चाळीस मिनिटांसाठी असेल अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. त्यामुळे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे. उद्या केवळ मुंबई-पुणे मार्गावरील आणि गणपती उत्सवानंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन, सूचना फलक बसवले जाणार आहेत. द्रुतगतीवरील बोरघाटात अथवा कोठेही वाहतूक कोंडी झाल्यास, पर्यायी मार्गजवळच प्रवाश्यांना तश्या सूचनासह अनेक फलक लागणार आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कारची ट्रकला धडक, २ ठार १ जखमी