कामकाजाच्या माहिती व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलिसांकडून उद्या कवायतीचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेमधील मुलांना पोलिस कामकाजाची माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये बालवयापासुनच सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ दोन आणि परिमंडळ चारच्या हद्दीमधील दोन शाळांमध्ये कवायतीचे आयोजन करण्यात आले आहे.

परिमंडळ दोनच्या हद्दीतील लष्कर पोलिस ठाण्याच्या परिसरात असणार्‍या उत्कर्ष इंग्लीश मिडीयम स्कुल (सोलापूर बाजार) आणि परिमंडळ चारच्या हद्दीतील खडकी पोलिस ठाण्याच्या परिसरात सेंट जोसेफ गर्ल्स स्कूलमध्ये पोलिसांकडून कवायतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ उद्या (दि. 13 डिसेंबर) सकाळी 7.30 वाजता आयोजित केला जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/