Tonsillitis Home Remedies | टॉन्सिल इन्फेक्शन त्रास देत असेल तर ‘या’ 7 उपायांनी घशाच्या वेदनांपासून होईल सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tonsillitis Home Remedies | घशाचे दुखणे एक आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिले तर तुम्हाला टॉन्सिलमध्ये इन्फेक्शन असू शकते. इन्फेक्शनमुळे टॉन्सिल सूजते आणि वेदना (Throat Pain) होतात, खाण्या-पिण्यास त्रास होतो, ताप येतो इत्यादी त्रास होतात. या समस्येवर काही घरगुती उपाय (Tonsillitis Home Remedies) असून ते जाणून घेवूयात.

1. लिंबूने करा उपचार (Treat with lemon) :
एक ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळा आणि त्यामध्ये मध आणि मीठ घालून त्याचे सेवन करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करा. आराम मिळेल.

2. दूधासोबत करा हळद आणि काळीमिरीचे सेवन (Consume turmeric and black pepper with milk) :
उकळत्या दुधात चिमुटभर हळद आणि चिमुटभर काळी मिरी पावडर मिसळून रात्री प्या. यामुळे टॉन्सिलची सूज आणि वेदनांमध्ये आराम मिळेल.

3. मीठाच्या पाण्याने गुळणी करा (Rinse with salt water) :
मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने टॉन्सिलिटिसच्या वेदनांमध्ये खुप आराम (Tonsillitis Home Remedies) मिळतो. गरम पाण्यात थोडे मीठ टाकून दिवसात दोन वेळा गुळण्या केल्यास आराम मिळेल.

4. गाजरचा ज्यूस प्या (Drink carrot juice) :
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, अँटी टॉक्सीन गुण असतात. हे टॉन्सिलिटिस कमी करते.

5. मेथीचे सेवन करा (Eat fenugreek) :
एक लीटर पाण्यात तीन चमचे मेथीदाणे टाकून पाणी हलके उकळवा आणि दिवसात अनेकदा या पाण्याने गुळण्या करा. दोन दिवसात टॉन्सिलिटिसपासून आराम मिळेल.

6. अंजीरच्या पेस्टचा उपाय (Solution of fig paste) :
अंजीर पाण्यात उकळवून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट घशावर लावा. यातून तुम्हाला टॉन्सिलिटिसने होणार्‍या वेदनेतून आराम मिळेल.

7. कॅमोमाईल टी सुद्धा परिणामकारक (Chamomile tea is also effective) :
कॅमोमाईल टी मध्ये लिंबू आणि मध मिसळून त्याचा वापर केल्याने टॉन्सिलिटिसमध्ये खुप आराम मिळतो. कॅमोमाईल टी तुम्ही दिवसातून दोनवेळा घेऊ शकता. (Tonsillitis Home Remedies)

Web Title :- Tonsillitis Home Remedies | know the five best home treatment to ease throat pain from tonsillitis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढीचा आलेख अजूनही चढताच

Clapping Therapy | टाळी वाजवा आणि रोग पळवा, जाणून घ्या ‘Clapping Therapy’ चे 9 अमूल्य फायदे

KNOW YOUR POSTMAN | डाक विभागाने लाँच केले ’नो युअर पोस्टमन’ अ‍ॅप, एका क्लिकने मोबाइलवर येईल पोस्टमनची सर्व माहिती