दु:खद बातमी ! ‘DLS’ मेथडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल करणाऱ्या ‘टोनी लुईस’ यांचे निधन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – डकवर्थ – लुईस मेथड म्हणजेच DLS मेथडमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल झाला होता कारण या पद्धतीमुळे पावसात झालेले सामने निकाली काढणे सोपे झाले होते. हीच मेथड तयार करणारे जनक 78 वर्षीय टोनी लुईस यांचे निधन झाले आहे. 90 वच्या दशकात टोनी लुईस यांनी आपले सहकारी मॅथमॅटिशयन फ्रैंक डकवर्थ यांच्यासह मिळून हा नियम तयार केला होता.

1997 साली ही पद्धत टोनी लुईस आणि डकवर्थ यांनी तयार केला होता जी पद्धत 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने म्हणजे आयसीसीने स्वीकारली. रन बदलताना जर पाऊस झाला तर आयसीसीच्या डीएलएस मेथडने सामन्याचा निकाल काढला जातो. 2014 साली या मेथडचे नाव फक्त डीएल मेथड केले गेले परंतु 2014 साली त्याच्यासह एस नाव आणखी जोडले गेले होते.

डीएल मेथड बनली डीएलएस मेथड –
2014 साली टोनी लुईस आणि फ्रैंक डकवर्थ यांच्या टीमसोबत ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलॅंडमध्ये राहणारे प्रोफेसर स्टीवन स्टर्न देखील यात सहभागी झाले. यानंतर मेथडचे नवा डकवर्थ-लुईस-स्टर्न मेथड म्हणजेच DLS मेथड ठेवण्यात आले. या मेथडचा सर्वात पहिला प्रयोग 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलॅंडच्या वर्ल्ड कपमध्ये झाला होता ज्यात यश मिळाल्यानंतर नियम वापरण्यास सुरुवात झाली आणि ती अधिकृत झाली.

टोनी लुईस यांच्या निधनाची माहिती इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डने दिली. ज्यात लिहिले होते की, ही ईसीबीसाठी अत्यंत दु:खद बाब आहे की 78 वर्षाच्या वयात टोनी लुईस एमबीई यांचे निधन झाले. टोनी आणि फ्रैंक दोघांनी क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले ज्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत, आम्ही टोनी यांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.