‘या’ पद्धतीने व्यायाम केल्यास कमी होऊ शकतो ‘स्पर्म काउंट’, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकजण निरोगी आणि सदृढ राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करत असतात. याचा फायदा असा होतो की झोप चांगली लागते. परंतु तुम्ही जर अतिरीक्त व्यायाम करत असाल तर हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे इनफर्टिलिटीची समस्या निर्माण होऊ शकते. याच बाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
exercise1
१) वंध्यत्व आणि मासिक पाळी-
जर तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम करत असाल तर, वंध्यत्वाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय महिलांमध्ये अमानोरियाची समस्या निर्माण होऊ शकते. यात महिलांना ३ महिने मासिक पाळी येत नाही.
Exercise-2
२) सेक्स आणि प्रेग्नंसी –
जर महिला जीमला जात असेल आणि गरजेप्रमाणे कॅलरीज आहारातून घेत नसतील तर याचा थेट परिणाम प्रेग्नंसीवर होतो. याशिवाय सेक्समधील रुचीवरही याचा परिणाम दिसून येतो.
exercise-3
३) लठ्ठ महिला आणि अ‍ॅस्ट्रोजन –
लठ्ठ महिलांमध्ये अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार होत असतं. याचा परिणाम थेट अंडाशयावर आणि मासिक पाळीवर होतो. वंध्यत्वाचे हेही एक कारण आहे. अ‍ॅस्ट्रोजनचे शरीरातील प्रमाण संतुलित नसेल तर प्रेग्नंसीमध्ये अडचण येते.
exercise-4
४) स्पर्म काऊंट कमी होतो –
पुरुष जर प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम करत असेल तर त्याचा स्पर्म काऊंटवर परिणाम होतो. यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
exercise-6
५) नकारात्मक प्रभाव –
तासन् तास व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जीमसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणेही गरजेचे आहे.

टीप – लेखातील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत असल्याने या गोष्टी आमलात आणताना तज्ज्ञांशी संवाद जरूर साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like