काँग्रेस खासदाराने घेतली हिंदीमधून ‘शपथ’ ; सोनिया गांधींनी केले ‘असे’ काही कि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. पहिल्या दिवशी ३१३ सदस्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर काल उर्वरित सदस्यांनी शपथ घेतली. काल अनेक खासदारांनी आपल्या मातृभाषेत शपथ घेतली. त्यात महाराष्ट्र्रातील सार्वधिक खासदारांचा समावेश होता. त्यानंतर अनेक राज्यातील खासदारांनी आपल्या मातृभाषेतून शपथ घेतली. तर काही खासदारांनी इंग्रजीमधून शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील इंग्रजीमधूनच शपथ घेतली.

मात्र केरळमधील खासदार कोडिकुन्निल सुरेश यांनी हिंदीमधून शपथ घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांना कारण विचारले. सुरेश यांनी हिंदीमधून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक खासदारांनी त्यांच्या या कृतीचे स्वागत केले. मात्र सोनिया गांधी यांना ते आवडले नव्हते, ते त्यांच्या कृतीतून दिसून आले. यानंतर सोनिया गांधी यांनी सुरेश यांना कडक सूचना दिल्या आणि केरळमधील उर्वरित खासदारांना मल्याळी भाषेत शपथ घेण्यास सांगितले.

याविषयी सुरेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, मागील वेळी मी इंग्रजीमधून शपथ घेतली होती. त्यामुळे यावेळी बदल म्हणून मी हिंदीत शपथ घेण्याचा विचार केला. यामागे दुसरे काहीही कारण नाही.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या या आदेशानंतर केरळमधील दोन खासदार राजमोहन उन्नीथन आणि वीके श्रीकांतन यांनी देखील मल्याळम भाषेतून शपथ घेतली. याआधी त्यांनी हिंदी भाषेतून शपथ घेण्याची तयारी केली होती. खासदार कोडिकुन्निल सुरेश हे सलग सहा वेळा काँग्रेसकडून केरळमध्ये खासदार म्हणून निवडून आले आहेत. केरळ काँग्रेसमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय 

जाणून घ्या. कुष्ठरोगा बाबतचे समज-गैरसमज 

 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय