Toolkit Case : टूलकिट केसमध्ये दिशा रवीला मिळाला जामीन, भरावा लागेल 1 लाख रुपयांचा मुचलका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ’टूलकिट’ प्रकरणात अटक असलेली पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला पटियाला हाऊस कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. दिशा रवीची एक दिवसाची कस्टडी संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात सादर केले. जस्टिस धर्मेंद्र राणा यांनी दिशाचा जामीन अर्ज मंजूर केला. जस्टिसने दिशाला एक लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन दिली. मात्र, दिशाच्या वकीलांनी कोर्टात म्हटले की, दिशाचे कुटुंब इतकी रक्कम देण्यास सक्षम नाही.

पटियाला हाऊस कोर्टामध्ये शनिवारी दिशाच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. अ‍ॅडिशनल सेशन जज धर्मेंद्र राणा यांच्या कोर्टाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीनावर निर्णय मंगळवारपर्यंत राखून ठेवला होता.

दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलना पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर जारी ‘टूलकिट गुगल कागदपत्र’ चौकशीसाठी 13 फेब्रुवारीला बेंगळुरूतून दिशा रवीला अटक केली होती. या प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने जॅकब आणि मुलुक यांना ट्रांजिट जामीन दिली होता.

शांतनु-निकिताला आणायचे आहे दिशाच्या समोरा-समोर
सोमवारी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, दिशा रवीने सर्व आरोप शांतनु-निकितावर टाकले आहेत, अशावेळी त्यांना त्या तिघांना समोरा-समोर आणून चौकशी करायची आहे. दिल्ली पोलिसांकडून न्यायालयाला झूम मीटिंगची माहिती देण्यात आली, ज्याचा संबंध टूलकिट बनवणे आणि पुढे पसरवण्याशी आहे.

यापूर्वी शनिवारी न्यायालयात सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांनी दिशा रवीच्या जामिनाला विरोध करत म्हटले की, हे एकच ’टूलकिट’ नव्हते, खरा प्रयत्न भारताला बदनाम करणे आणि येथे अशांतता निर्माण करणे होता. दिशाने व्हॉट्सअपवर झालेले चॅट डिलिट केले होते, तिला कायदेशीर कारवाईची माहिती होती. यातून स्पष्ट होते की, ’टूलकिट’च्या पाठीमागे वाईट हेतू होता.

शनिवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी म्हटले की, दिशा रवी भारताला बदनाम करणे आणि शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या आडून अशांतता निर्माण करण्याच्या जागतिक कटाच्या भारतीय चॅप्टरचा भाग होती. दिल्ली पोलिसांनी कोर्टात म्हटले की, एक प्रतिबंधित संघटना सिख फॉर जस्टिसने 11 जानेवारीला इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावण्यासाठी बक्षिसाची घोषणा केली होती.

पोलिसांनुसार, काही कारणामुळे हे टूलकिट सोशल मीडियावर लीक झाले. पब्लिक डोमेनमध्ये हे सर्चमध्ये होते. त्यास हटवण्याचा कट बनवण्यात आला आणि आंदोलन करण्यात आले.