‘क्या आपके टूथपेस्ट में टॉक्सिक केमिकल्स है’, जाणून घ्या परिणाम

पोलिसनामा ऑनलाइन – टूथपेस्टच्या खूप लक्षवेधक जाहिराती टीव्हीवर केल्या जातात. क्या आपके टूथपेस्ट मे नमक है, असाही प्रश्न जाहिरातीमधून ग्राहकाला विचारला जातो. याच जाहिराती पाहून अनेकजण टूथपेस्ट खरेदी करतात. पण, या टूथपेस्टमध्ये असणारे इन्ग्रीडिएंट्सविषयी आपण कधीच विचार करत नाही. बहुतांश टूथपेस्टमध्ये टॉक्सिक केमिकल्स असतात. हे जास्त प्रमाणात शरीरामध्ये गेल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यातील टॉक्सिक केमिकल्समुळे कर्करोगासारखा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. या रसायनांची माहिती टूथपेस्टच्या कव्हरवर खूप लहान अक्षरांत लिहिली असताना त्याबाबत कुणालाही काही समजत नाही.

तज्ज्ञ सांगतात, ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना टूथपेस्ट वापरण्यासाठी देत असाल तर आधी डेंटिस्टना विचारा. टूथपेस्टमध्ये असे टॉक्सिक असतील तर त्याचा वापर करू नये.टूथपेस्टमध्ये टड्ढायक्लोसेन नावाचे केमिकल असते. यामुळे हार्मोनल परिणाम होऊ शकतो. तसेच अनेक प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. तसेच सोडियम लॉरिल सल्फेट हे एक प्रकारचे डिटर्जंट असून ते टूथपेस्टमध्ये असते. यामुळे फेस होतो. यामुळे स्किन इरिटेशन, तोंड येणे आणि जळजळ होऊ शकते. तसेच टूथपेस्टमधील मायक्रोबीड्सच्या लहान प्लास्टिकच्या तुकड्यांमुळे पर्यावरणासोबतच दातांच्या एनॅमलचे नुकसान होते.

बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते. तसेच आर्टिफिशियल स्वीटनर्स असलेल्या सेकरीन आणि मेथानॉलमुळे डोकेदुखी, चक्कर येणे, पोट खराब होणे, हात-पाय थरथरण्यासारखी समस्या होऊ शकते. टूथपेस्टमध्ये फ्लोराइड हे एक टॉक्सिक रसायन असू शकते. हे शरीरामध्ये गेल्यावर न्यूरोलॉजिकल आणि थायरॉइडसंबंधित भयंकर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. तसेच प्रॉपिलीन ग्लायकॉल हे एक टॉक्सिक मटेरियल टूथपेस्टमध्ये असते. यामुळे स्किन डिसिज, रॅशेज, डोळ्यात जळजळ आणि फप्फुसांची समस्या होऊ शकते.

डायएथनोलामाइन या केमिकलमुळे हार्मोनलवर परिणाम होतो आणि पोट, यकृत, मूत्राशय किंवा फुप्फुसांसारखा आजार होऊ शकतो. यासाठी आयुर्वेदिक घटक असलेली टूथपेस्ट वापरणे कधीही चांगले. मात्र, आयुर्वेदाच्या नावाखाली हीच घातक केमिकल्स टूथपेस्टमध्ये टाकण्यात आली नाही ना, हे पाहून घेतले पाहिजे.