‘या’ 10 देशांकडे सर्वाधिक सोन्याचा ‘साठा’, जाणून घ्या भारताचा ‘क्रमांक’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये सोन्याचा साठा मिळाल्यानंतर अशी शक्यता वर्तवली जात आहे की, सोने उत्पादनात आता भारत मोठी झेप घेऊन जगात दुसर्‍या क्रमांकावर येईल. सध्या भारत सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत खुप मागे आहे. कोणत्या 10 देशांकडे सर्वात जास्त सोने आहे, ते जाणून घेवूयात.

1 – वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेजवळ भारतापेक्षा 13 पट जास्त सोने आहे. अमेरिकेजवळ एकुण 8,133.5 टन सोन्याचा साठा आहे.

2 – तर, दूसर्‍या स्थानावर जर्मनी आहे. जर्मनीच्या साठ्यात 3,366.8 टन सोने आहे.

3 – अमेरिका आणि जर्मनीनंतर अंतरराष्ट्रीय मुद्रा फंड (आएमएफ) जवळ एकुण 2,451.8 टन सोने आहे.

4 – यानंतर इटलीचा क्रमांक येतो. इटलीजवळ 2,451.8 टन सोने आहे.

5 – तर, फ्रान्सजवळ 2,436.1 टन सोने आहे.

6 – रशियाकडे 2,219.2 टन सोने आहे.

7 – भारताचा शेजारी देश चीनकडे 1,936.5 टन सोने आहे.

8 – स्विझरलँडकडे 1,040 टन सोने आहे.

9 – जापानकडे 765.2 टन सोने आहे.

10 – भारताकडे 618.2 टन सोने आहे.