Flashback 2019मनोरंजन

Flashback 2019 : ‘या’ गाण्यानं नेटकर्‍यांना लावलं ‘याड’, इंटरनेटवर झालं सर्वाधिक ‘सर्च’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – इंटरनेटचं जग असं म्हणलं जातं. सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा असं काही व्हायरल होतं, त्याचं सर्चिंग असं वेगानं होत की ते सर्च टॉप सर्चमध्ये जाते. असचं एक गाणं इतकं सर्च झालं की गुगलच्या टॉप सर्चमध्ये त्याची गणना झाली. ‘ले फोटो ले; हे गाणं तुम्ही कधी ऐकलं आहे का ? नसेल ऐकलं तर नक्की ऐका. सोशल मिडियावर हे गाणं धूमाकूळ घालत आहे.

गुगलने नुकतीच टॉप 10 सर्वाधिक सर्च गाण्याची यादी जाहीर केली. या यादीत ‘ले फोटो ले’ हे नीलू रंगेलीचं गाणं पहिल्या क्रमांकावर आहे. तर राणू मंडल यांचे तेरी मेरी कहानी हे गाणं या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतू नीलू रंगीली हे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारं गाणं ठरलं आहे.

ले फोटे ले हे गाणं जवळपास 11 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. हे एक राजस्थानी गाणं आहे. मेवारी ब्रदर्स यांनी गेल्यावर्षी चेतक कॅसेट्ससाठी या गाण्याची निर्मिती केली. हे गाणं सुरुवातीला राजस्थापुरतेच मर्यादित होते परंतू नंतर दिल्लीतील एका कॉलेजमध्ये नृत्यस्पर्धेत हे गाणे वाजले आणि लोकप्रिय झाले. आज नीलू रंगीली यांनी गुगलवर सर्वाधिक सर्च होण्याचा विक्रम रचला.

टॉप 10 सर्व गाणी –
1. ले फोटो ले
2. तेरी मेरी कहानी
3. तेरी मेरी प्यारी दो अखिया
4. वास्ते
5. कोका कोला
6. गोरी तेरी चुनरीया बा… ला.. ला.. रे
7. पल पल दिल के पास
8. लडकी आंख मारे
9. पायलीया बजनी लाडो पिया
10. क्या बात है

ही आहेत टॉप 10 गाणी, जी तुम्ही ऐकली नसेल तर नक्की ऐका. ही गाणी सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Back to top button