World Cup मध्ये ‘हे’ १२ महागडे पंच ; ‘एवढा’ आहे त्यांचा वेतन

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विश्वचषक २०१९ ला इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरुवात होते. जगातील सर्व क्रिकेट रसिकांचे या गोष्टीकडे लक्ष लागले आहे. या सगळ्यात भारतीय क्रिकेटपटूंचे राहणीमान, त्यांची कमाई या सगळ्या गोष्टींमध्ये क्रीडा रसिकांना उत्सुकता असते. क्रिकेटपटूंची कमाईही कोटींच्या घरात असते. पण कधी क्रिकेटमधील पंचाची कमाई पाहिली आहे का?, आज आपण याच पंचाच्या कमाईबद्दल जाणून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांना फार सावध राहावे लागते, एखादा निर्णय जरी चुकला तरी त्यांना मोठ्या प्रमाणवर रोषाला सामोरे जावे लागते. जितके पैसे त्यांना या कामासाठी मिळतात तितकीच महत्वाची जबाबदारी त्यांना पार पडायचे असते.

पाहुयात हे आहेत पुढील १२ महागडे पंच

१) सुंदरम रवी
भारतीय पंच सुंदरम रवी हे एस. व्यंकटराघवन यांच्यानंतर एलिट पॅनलमध्ये दुसरे भारतीय आहेत. सुंदरम रवी यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून पदार्पण केले आहे. त्यांना आयसीसीकडून २४ लाख ६० हजार रुपये वेतन मिळते.

२) अलीम दार
पाकिस्तानचे पंच अलीम दार हे देखील उत्तम आंतराष्ट्रीय पंच असून त्यांनी आतापर्यंत २००३,२००७ आणि २०११ मध्ये झालेल्या विश्वचषकात पंच म्हणून काम केले आहे. त्यांना आयसीसीकडून वार्षिक ३१ लाख ६३ हजार ११७ रुपये पगारही दिला जातो.

३) मराईस ईरास्मस
दक्षिण आफ्रिकेचे असलेले हे पंच आफ्रिकेकडून काही काळ क्रिकेट खेळलेले देखील आहेत. आयसीसीकडून मराईस यांनाही वार्षिक २४ लाख ६० हजार रुपये वेतन मिळते.

४) नाईलेज लॉन्ग
जगातील सर्वात उत्कृष्ट आणि महागडा पंच म्हणून नाईलेज लॉन्ग हे दुसऱ्या क्रमांकावर येतात. आपल्या उत्तम कौशल्याने सर्व क्रिकेट रसिकांच्या ते लोकप्रिय आहेत. २००२ मध्ये त्यांनी या करिअरला सुरुवात केली. त्यांना वर्षाला ३१ लाख ६३ हजार ११७ रुपये पगार मिळतो.

५) रॉड टकर
साऊथ वेल्स आणि तस्मानियासाठी देशातंर्गत क्रिकेटमध्ये खेळलेल्या टकर यांनी २००९ मध्ये पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. टकर यांना आयसीसीकडून वार्षिक २४ लाख ६० हजार रुपये वेतन मिळते.

६) पॉल रिफेल
११९९ साली विश्वकप जिंकणाऱ्या संघाचे सदस्य असणाऱ्या पॉल यांनी २००९ साली पांच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पॉल रिफेल यांना वर्षाला ३१ लाख ६३ हजार ११७ रुपये दिले जातात.

७) ब्रुस ऑक्सेनफोर्ड
२००१ पासून पंच म्हणून काम करणाऱ्या ब्रुस यांना आयसीसीकडून यांनाही वार्षिक २४ लाख ६० हजार रुपये वेतन मिळते.

८) क्रिस गफाने
२०१० पासून पंच म्हणून काम पाहणाऱ्या क्रिस गफाने यांना आयसीसीकडून वार्षिक ३१ लाख ६३ हजार ११७ रुपये दिले जातात.

९) रिचर्ड केटलबरो
इंग्लंडकडून स्थानिक स्पर्धांमध्ये खेळलेल्या रिचर्ड केटलबरो यांनी २०१० मध्ये पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आयसीसीकडून रिचर्ड यांनाही वार्षिक २४ लाख ६० हजार रुपये वेतन मिळते.

१०) इयान गूल्ड
इंग्लंडचे हे माजी क्रिकेट खेळाडू उत्तम पंच म्हणून काम करत आहेत. आयसीसीकडून त्यांना वार्षिक २४ लाख ६० हजार २०२ रुपये दिले जातात.

११) रिचर्ड इलिंगवर्थ
२००९ मध्ये आपल्या पंच म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रिचर्ड इलिंगवर्थ यांना आयसीसीकडून वार्षिक २४ लाख ६० हजार रुपये वेतन मिळते.

१२) कुमार धर्मसेना
श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे हे पंच खूप अचूक निर्णय देणारे पंच म्हणून ओळखले जातात. त्यांना आयसीसीकडून वार्षिक २४ लाख ६० हजार रुपये वेतन मिळते.

याचबरोबर या वेतनाव्यतिरिक्त प्रत्येक आंतराष्ट्रीय सामन्यासाठी वेगवेगळे मानधन दिले जाते. कसोटी सामना,एकदिवसीय सामना,आणि टी-२० सामना या प्रत्येक सामन्यासाठी त्यांना वेगवेगळे मानधन दिले जाते.