PAN Card 30 जूनपूर्वी Aadhaar शी करा लिंक, अन्यथा होईल ‘निष्क्रिय’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनमुळे अर्थ मंत्रालयाने पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करण्याचा कालावधी दहाव्यांदा वाढवला होता. आता पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करण्यासाठी अंतिम तारीख 30 जून आहे. एखाद्या व्यक्तीला जर नवीन पॅनकार्ड हवे असेल तर, त्याच्याजवळ सुद्धा आधारकार्ड असणे आवश्क आहे. एवढेच नव्हे, आयटीआर भरतेवेळी सुद्धा आधारकार्ड खुप जरूरी आहे. जर तुम्हीसुद्धा अजून पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक केले नसेल, तर 30 जूनपूर्वी जरूर करा. जाणून घेवूयात यासंदर्भातील माहिती…

1.  आयकर विभागद्वारे जारी पॅन नंबरला ई-फायलिंग पोर्टलद्वारे सहजपणे 12 अंकी आधारकार्ड नंबरशी लिंक करता येते. याशिवाय एसएमएसद्वारे सुद्धा पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करता येते. यासाठी तुम्हाला UIDPAN<12digit Aadhaar><10digitPAN> फॉर्मेटमध्ये मेसेज लिहिून 567678 किंवा 56161 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

2.  ज्यांना पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करण्यासाठी ऑनलाइन पद्धत शक्य नाही, ते ऑफलाइन सुद्धा लिंक करू शकतात. यासाठी NSDL आणि UTITSL च्या पॅन सर्व्हिस सेंटर्सशी संपर्क साधावा.

3.  केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करणे जरूरी केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने अंतिम तारीख म्हणजेच 30 जूनपर्यंत पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक नाही केले, तर त्याचे पॅनकार्ड आयकर विभाग निष्क्रिय घोषित करणार आहे. याचा अर्थ अशा लोकांना पॅनकार्डवरून आयटीआर फाइल करने, बँक अकाऊंट उघडणे आणि पेमेन्ट करण्यासारखी कामे करता येणार नाहीत.

4. जर एखादी व्यक्ती निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डचा वापर करताना आढळली तर त्यास 10,000 रुपयांचा दंड लागू शकतो.

5.  एनआरआय लोकांसाठी पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करणे जरूरी नाही. मात्र, एनआरआय लोकांना अनेक आर्थिक व्यवहारात आधारकार्डची आवश्यकता असते.