वास्तु टिप्स : कशी येणार तुमच्या घरात ‘सुख-शांती-समृध्दी’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये बदल केल्यास घरात सुख शांती येऊ शकते. यामुळे घरामधील ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलते. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. ज्यामुळे तुमच्या घरातील अशांती दूर होईल.

1) चांगल्या संबंधांसाठी पाहुण्यांचा कक्ष उत्तर किंवा पश्चिमेच्या दिशेला असावा.
2) आरोग्यासाठी उत्तर पूर्व दिशेला औषधे ठेवल्याने चांगला परिणाम दिसतो.
3) सगळे नीट असून देखील तुम्हाला असे वाटत असेल की पैसे हातात टिकतच नाहीत तर तुमच्या घरापासून दक्षिण पूर्व दिशेला असणारा निळा रंग काढून टाका. या दिशेला नारंगी किंवा हलक्या गुलाबी रंगाचा वापर करा.
4)घरात होणारे जाळे धुळ झटकून टाकून साफसफाई ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही.
5) पार्किंगसाठी वायव्य स्थान वापरणे शुभ मानले जाते.
6) घरातील भांड्यामधे लावलेल्या झाडांना आणि रोपट्यांना नियमितपणे पाणी द्यायला हवे. जर एखादी रोपटे वाळत असेल तर ताबडतोब काढून टाका.
7) दक्षिण-पश्चिम दिशेला ओव्हरहेड पाण्याची टाकीची व्यवस्था करणे फायदेशीर आहे.
8) दरवाजा बंद करताना किंवा खोलताना कोणताही आवाज येता कामा नये.
9) घरामध्ये देवघर असेल तर नियमितपणे पूजा केली गेली पाहिजे.
10) आग्नेय दिशेला किचनमध्ये गॅस असावा.
11) बेडरूममधील टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला हवा आणि झोपताना आरसा झाकून झोपावे.
12) कोणत्याही व्यक्तीने दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये नाहीतर झोपताना अस्वस्थता जाणवेल.
13) बेडरूमच्या मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपू नका. पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपल्याने आध्यात्मिक पणामध्ये वाढ होते.
14) घराच्या खोलीमध्ये रोपटी, खात्याचे वृक्ष, निवडुंग अशा गोष्टी ठेवणे टाळावे.
15) भवनामध्ये उत्तर दिशा ईशान दिशा, पूर्व दिशा, वायव्य दिशेला हलके सामान ठेवणे शुभ समजले जाते.
16) दक्षिण पूर्व दिशेला आगीशी संबंधित उपकरणे ठेवणे फायदेशीर ठरते.
17) घरातील विद्युत उपकरणांमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत काम नये.