Top 3 Cheapest Car India | कमी असेल बजेट तर 4 लाख रुपयात घेऊन जा ‘या’ टॉप 3 कार, मिळेल 22 kmpl चे मायलेज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Top 3 Cheapest Car India | कार सेक्टरच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कारची मोठी रेंज आहे आणि ज्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार आहेत तो हॅचबॅक सेगमेंट आहे. कमी बजेटपासून ते हाय रेंजपर्यंतच्या कार या सेगमेंटमध्ये सहज उपलब्ध आहेत. (Top 3 Cheapest Car India)

 

जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल, परंतु कमी बजेटमुळे खरेदी करता येत नसेल, तर आम्ही तुम्हाला या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त टॉप 3 कारची संपूर्ण माहिती सांगणार आहोत ज्या तुमच्या बजेटमध्ये आरामात बसू शकतात.

 

1. मारुती अल्टो :
मारुती अल्टोमध्ये कंपनीने 796 cc 0.8 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 48 PS पॉवर आणि 69 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. (Top 3 Cheapest Car India)

 

कारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही कार 22.05 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. मारुती अल्टो 800 चे बेस मॉडेल 3,39,000 रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम, दिल्ली) जे 3,76,784 रुपयांपर्यंत जाते.

 

2. डॅटसन रेडी गो :
Datsun redi GO ही या सेगमेंटमधील मारुती अल्टो नंतर दुसरी सर्वात कमी किमतीची कार आहे ज्यामध्ये कंपनीने 999 cc 0.8 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 54 पीएस पॉवर आणि 72 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

 

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Datsun redi GO 22.0 kmpl चा मायलेज देते.
हे मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. Datsun redi GO चे बेस मॉडेल रु. 3,83,800 (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जे रस्त्यावर रु. 4,20,500 पर्यंत जाते.

3. मारुती एस-प्रेसो :
Maruti S-Presso ही त्यांच्या कंपनीची तसेच या देशातील सर्वात कमी किमतीची मायक्रो SUV आहे.
या SUV मध्ये कंपनीने 998 cc चे 1 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे.
हे इंजिन 68 पीएस पॉवर आणि 90 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

 

मायलेजबद्दल, मारुती सुझुकीचा दावा आहे की ही कार 21.4 kmpl चा मायलेज देते
आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
Maruti S Presso च्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 3,99,500 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी रस्त्यावर असताना 4,41,523 रुपयांपर्यंत जाते.

 

Web Title :- Top 3 Cheapest Car India | top 3 cheapest car in india which comes in budget of 4 lakhs gives 22 kmpl mileage read complete details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

 

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

 

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत