मोठी फॅमिली आणि बजेट कमी, खरेदी करा ‘या’ 5 स्वस्त सेव्हन सीटर कार, किंमत 4 लाखांपासून सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोणत्याही मीडल क्लास फॅमिलीसाठी कार खरेदी करणे स्वप्नासारखे असते. परंतु जर फॅमिली मोठी असेल तर ही समस्या आणखी मोठी होते. कारण बाजारात 5 सीटर कार खुप आहेत, परंतु 7 सीटर कार खुप कमी आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी 5 अशा 7 सीटर कार घेऊन आलो आहोत, ज्या स्वस्त आणि चांगल्या आहेत.

7 सीटर कारच्या लिस्टमध्ये पहिले नाव रेनॉ ट्रायबरचे येते. भारतीय बाजारात ट्रायबरची सुरुवातीची किंमत 5.20 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 7,50,000 रुपये आहे. भारतीय बाजारात मीडल क्लास फॅमिलीसाठी ही एक शानदार कार आहे. हिचा लुक एखाद्या प्रीमियम कारपेक्षा कमी नाही.

रेनॉ ट्रायबरमध्ये 999 सीसीचे 3 सिलेंडरचे इंजिन दिले आहे. जे 6250 आरपीएमवर 71 एचपीची पॉवर आणि 3500 आरपीएमवर 96 एनएमचा टॉर्क जेनरेट करते. फीचर्सबाबत बोलायचे तर या कारमध्ये 8-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटनमेंट सिस्टम, सेकंड अँड थर्ड रो सीटसाठी एसी वेंट्स, सेफ्टीसाठी एयरबॅग्ज सारखे फिचर्स आहे.

या रांगेत दुसरे नाव Datsun Go Plus चे येते. तिची सुरुवातीची किंमत 4.20 लाख रुपये आहे. म्हणजे एका मध्यवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी ही कार सर्वात स्वस्त आहे. हिचा लुक सुद्धा अतिशय शानदार आहे. या कारमध्ये 1198 सीसीमध्ये 3 सिलेंडर एसओएचएस पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 5000 आरपीएमवर 67 एचपीची पावर आणि 4000 आरपीएमवर 104 एनएमचा टॉर्क जेनरेट करते.

याशिवाय मारुती सुझुकी इको (Eeco) ला खुप डिमांड आहे. या कारची सुरूवातीची किंमत 3,97,800 रुपये (दिल्ली एक्स शोरूम) आहे. म्हणजे 4 लाखापेक्षा कमी किमतीत ही उपलब्ध आहे. इकोमध्ये 1196सीसीचे 4 सिलेंडरचे पेट्रोल इंजिन आहे. जे 6000 आरपीएमवर 72.41 एचपीची पॉवर आणि 3000 आरपीएमवर 101 एनएमचा टॉर्क जेनरेट करते. मारुती सुझुकी इको पेट्रोलमध्ये 16.11 कि.मी प्रति लीटरचे मायलेज देऊ शकते. तर मारुती सुझुकी इको सीएनजीमध्ये 21.94 किमी प्रति किलोचा मायलेज देऊ शकते.

याशिवाय मारुती सुझुकी अर्टिगा सुद्धा मीडल क्लास मोठ्या फॅमिलीसाठी चांगली कार आहे. या 7 सीटर कारची सुरुवातीची किंमत 7.59 लाख रुपये आहे. ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. भारतात या कारला खुप डिमांड आहे आणि सध्या वेटिंग पीरियड मोठा आहे.

जर बजेट थोडे जास्त आहे तर आपण महिंद्राची 7 सीटर कार Mahindra Marazzo खरेदी करू शकता. तिची सुरुवातीची किंमत 9.61 लाख रुपये आहे. या सेगमेंटमध्ये टोयोटा इनोव्हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. दूरच्या प्रवासासाठी जर इनोव्हा असेल तर प्रवास अतिशय आरामदायक होतो. Toyota Innova Crysta ची सुरुवातीची किंमत 15.7 लाख रुपये आहे.