नववर्षात ‘या’ 5 सरकारी स्कीममध्ये गुंतवणूक करा, भविष्य उज्वल होईल शिवाय पैसे राहतील सुरक्षित, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भविष्य सुधारण्यासाठी केवळ पैशांचीच नाही तर योग्य जागी गुंतवणुकीची देखील आवश्यकता असते. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केलेली नसेल तर नव्या वर्षांमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करू शकता. यासाठी तुम्ही काही सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता ज्यामधून तुम्हाला चांगले रिटन्स मिळतील.

केंद्र सरकारच्या या पाच योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.

1) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
पीपीएफमध्ये गुंतवणूक हा सर्वसामान्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. जर मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफमध्ये नक्की गुंतवणूक करा. सध्या सरकारकडून पीपीएफवर 8 % नी व्याज दिले जात आहे. त्यामुळे या वर्षी गुंतवणुकीसाठी तुम्ही या योजनेचा पर्याय निवडू शकता. विशेष म्हणजे 500 रुपयांपासून देखील यामध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते खोलू शकता.

2) सुकन्या समृद्धी योजना
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेबाबत विचार करू शकता. मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी ही योजना खूप लाभदायक आहे. या योजनेमध्ये वर्षाला 8.40 % व्याज मिळते. आयकरात सूट आणि कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळणारे पैसे हे टॅक्स फ्री असतात. 250 रुपयांपासून यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.

3) अटल पेन्शन योजना
असंगठित पद्धतीने काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना खूप लाभदायक आहे. 2015 मध्ये मोदी सरकारने या योजनेचा प्रारंभ केला होता. या योजेनुसार तुम्हाला निवृत्तीनंतर अधिक फायदा होता. 18 ते 40 वर्षांचे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि यासाठी वीस वर्ष गुंतवणूक करावी लागेल. योजनेनुसार कमीतकमी एक हजार आणि जास्तीत पाच हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळू शकते. गुंतवणूक दाराचा यामध्ये अचानक मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक ही योजना पुढे सुरु ठेऊ शकतात.

4) पंतप्रधान श्रम (मजूर) योगी मानधन योजना
15 हजार रुपये महिन्याला कमावणाऱ्या कामगारांसाठी ही योजना आहे.
वय 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षांचे कामगार गुंतवणूक करू शकतात.
केवळ 55 रुपये प्रती महिन्याला गुंतवून करून 3 हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळवू शकता.
जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत प्रत्येक महिन्याला गुंतवणूक केली जाऊ शकते.

5) जनसुरक्षा योजना
9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला सुरुवात केली होती. ज्यात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) देखील समाविष्ट होते. या योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा देण्यात येतो. म्हणजेच जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबास दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते. पीएमजेजेबीवायअंतर्गत मिळणार्‍या पॉलिसीचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते आणि त्यासाठी प्रीमियम 330 रुपये द्यावे लागतात. सरकारचा असा दावा आहे की आतापर्यंत 5.91 कोटी भारतीय या योजनेत सामील झाले आहेत.

या व्यतिरिक्त पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) देखील सर्वसामान्यांसाठी आहे. सरकारची ही योजना 18 ते 70 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी आहे. ही अपघात विमा योजना आहे. त्यासाठी वर्षाकाठी फक्त 12 रुपये प्रीमियम भरावा लागतो. जर या योजनेच्या लाभार्थ्यास अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्वावर 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/