प्रेमासाठी काय पण ! ‘या’ टॉप ४ अभिनेत्रींनी प्रेमासाठी बदलला आपला ‘धर्म’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोणतीही जात किंवा धर्म प्रेमापेक्षा मोठा नसतो किंवा प्रेमाला जातीधर्माच्या बेड्या थांबवू शकत नाहीत असे म्हणतात. बॉलिवूडच्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींनीं मात्र आपल्या कृतीतून हे सिद्ध केले आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध ताऱ्यांमध्ये असे अनेकजण आहेत ज्यांनी आपल्या प्रेमासाठी धर्मपरिवर्तन केले आहे. आज आपण अशा काही अभिनेत्रींनबद्दल जाणून घेऊ ज्यांनी प्रेमासाठी हिंदू धर्म बदलून त्या मुस्लिम झाल्या आहेत.

१)अमृता सिंह

Amruta Saif

बॉलीवूड सिनेतारका अमृता सिंह यांनी अभिनेता सैफ अली खान यांच्याशी लग्न केले आहे. एकेकाळी हे दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते आणि या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर झाल्या. सैफ पेक्षा २० वर्षांनी लहान असणारी अमृता हीचा धर्मदेखील हिंदू होता तर सैफचा मुस्लिम. परंतू धर्म किंवा वयाच्या कोणत्याही बंधनांना न जुमानता अमृताने धर्म बदलून सैफ शी लग्न केले. परंतु त्यांचे नाते जास्त काळ टिकले नाही.

२)आयेशा टाकिया

Ayesha takia

वयाच्या १८ व्या वर्षी २००४ साली ‘टार्झन द वंडर कार’ या आपल्या पहिल्या चित्रपटातून आयेशा ने आपल्या आपल्या बॉलीवूड कारकिर्दीची सुरुवात केली होती. अग्रगण्य अभिनेत्रींनमध्ये नाव असणाऱ्या आयेशाच्या ‘दिल मांगे मोर’, ‘सोचा ना था’, ‘डोर’, ‘कैश’, ‘संडे’, ‘दे ताली’, ‘वॉन्टेड’, ‘पाठशाला’ इत्यादी चित्रपटांमधील भूमिका मोठ्या प्रमाणावर गाजला होता. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा होता.पारंपरिक गुजराती हिंदू कुटुंबातील आयेशा फरहान आझमी नावाच्या मुस्लिम राजकीय नेत्याच्या प्रेमात पडली. २००९ साली तिने आपला धर्म बदलून आझमी यांच्याशी लग्न केले. त्यांचा एक मुलगा देखील आहे. २०११ साली तिचा “मोड” हा शेवटचा चित्रपट आला होता त्यानंतर मात्र आयेशा ने चित्रपटात काम केले नाही.

३)ममता कुलकर्णी

Mamata kulkarni
ममता कुलकर्णी आणि तिचे पती विकी गोस्वामी यांना मात्र मुस्लिम धर्म काहीसा बळजबरीने स्वीकारावा लागला होता. त्यांचे पती विकी गोस्वामी यांना यूनाइटेड अरब एमिराती (युएई) मध्ये ड्रग्स च्या तस्करी प्रकरणी २५ वर्षांची मोठी शिक्षा सुनावली होती. शिक्षा कमी करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारण्याची अट त्याच्यासमोर ठेवण्यात आल्याने नाईलाजाने त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. त्यानंतर २००१ साली विकी गोस्वामी जेलमधून सुटल्यानंतर ममताला देखील विकिशी लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला होता.

४)करीना कपूर

Mamata kulkarni

बॉलिवूडची ‘बेबो’ अभिनेत्री करीना कपूर २०१२ साली सैफ अली खान याच्याशी विवाहबद्ध झाली. सैफची करीना हि दुसरी बायको असल्याचे अनेकांना माहित आहे. आपली पहिली बायको अमृता हिच्याशी १९९१ साली लग्न केल्यानंतर २००४ साली सैफने घटस्फोट घेतला होता. त्यांनतर सैफच्या आयुष्यात आलेल्या करिनाने त्याच्याशी २०१२ साली लग्न केले. त्यांचा एक मुलगा देखील असून त्याचे नाव त्यांनी तैमूर अली खान असे ठेवले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like