पाकिस्तानच्या ड्रोनला ‘टक्कर’ देण्यासाठी भारतीय सैन्य तयार, ‘हा’ आहे ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमध्ये पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या हत्यार आणि ड्रग्जच्या स्मगलिंगला आळा घालण्यासाठी भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत सर्व टॉपच्या अधिकाऱ्यांसह तयार आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्याने काल एका आधुनिक ड्रोनचे प्रदर्शन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांच्या कॉन्फरन्समध्ये काही विदेशी आणि स्वदेशी ड्रोनचे प्रदर्शन करण्यात आले. याआधी वापरात असणारे तसेच भविष्यात वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचे देखील यावेळी प्रदर्शन करण्यात आले.

पाकिस्तानी ड्रोन से निपटने के लिए तैयार भारतीय सेना, ये है नया प्लान

निशाणा सापडून करतात टार्गेट –
सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही ड्रोनचा वापर उंचावर सामानाची वाहतूक करण्यासाठी देखील करण्यात येते. त्याचबरोबर काही हत्यारयुक्त ड्रोन देखील असून जे आपला निशाणा सापडून त्यांना टार्गेट करतात. मागील आठवड्यात पाकिस्तानमधून आलेल्या ड्रोनमुळे भारतीय सैन्याची डोकेदुखी वाढली आहे.

भारतीय सीमेत आढळले ड्रोन –
8 आणि 9 ऑक्टोबरच्या दरम्यान भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दोन वेळा आढळून आले होते. पंजाबमधील एका गावात हे ड्रोन आढळून आले होते. यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या ड्रोनला नष्ट करण्यासाठी ड्रोन भेदणाऱ्या प्रणालीची मागणी केली आहे. यासाठीच काल सैन्याची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी देखील पंजाब पोलिसांनी दोन ड्रोन पकडले होते. या ड्रोनमधून 5 AK-47, पिस्टल, हॅन्ड ग्रेनेड आणि सॅटेलाईट फोन जप्त केले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like