पूजा आणि वडिल महेश भटचं ‘लिपलॉक’ KISS ते शर्लिन चोपडा, तनुश्री दत्तासह ‘हे’ बॉलिवूडमधील टॉप 5 शॉकिंग वाद !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमध्ये असे अनेक वाद होऊन गेले आहेत ज्यांची खूप चर्चा झाली आहे. कदाचित तुमचा यावर विश्वासही बसणार नाही. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

1) तनुश्री दत्ता- 2018 मध्ये तनुश्री दत्ता सर्वाधिक चर्चेत राहिली होती. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तनुश्रीनं सांगितलं की, हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नानानं तिच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. जेव्हा मी याची तक्रार डायरेक्टर आणि प्रोड्युसरकडे केली तेव्हा त्यांनी या गाण्यात नाना आणि माझे इंटिमेट सीन टाकले. यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo ला सुरुवात झाली.

2) महेश भटनं मुलीलाच केलं लिपलॉक किस- डायेरक्टर आणि प्रोड्युसर महेश भट कायमच वादात राहिले आहेत. अनेक वर्षांपूर्वी स्टारडम या मॅगेझीन साठी त्यांनी मुलगी पूजा भटसोबत लिपलॉक किसिंग सीन दिला होता. हा मॅगेझिनवरचा कवर फोटो होता. यावरून खूप वाद झाला होता. महेश असेही म्हणाले होते की, पूजा जर माझी मुलगी नसती तर तिच्यासोबत लग्न केलं होतं. यानंतर वाद अजूनच वाढला होता.

3) सलमान खान आणि ऐश्वर्या राय- सलमान ऐश्वर्याची लव स्टोरी आणि ब्रेकअप खूप चर्चेत राहिलं आहे. ब्रेकअपनंतर ऐशनं सांगितलं की, सलमाननं घराच्या बाहेर येऊन खूप राडा घातला होता. सलमान तिला मारहाण आणि जबरदस्ती करायचा असंही ती म्हणाली होती.

4) अभिनेत्रींची कॅठ फाईट- बॉलिवूड स्टार ईशा देओल आणि अमृता राव खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. एकदा अमृतानं सिनेमाच्या सेटवर ईशाबद्दल काही चुकीचं बोललं होतं. यानंतर ईशानं तिला सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. यानंतर त्यांची मैत्री तुटली. या मॅटरमुळं दोघी खूप दिवस चर्चेत होत्या.

5) शर्लिन चोपडा- शर्लिन चोपडानं खुलासा केला होता की, जेव्हा बॉलिवूडमध्ये जेव्हा कोणी म्हणतं की, डिनर करूया तेव्हा त्यांच्या डिनरचा अर्थ कॉम्प्रोमाईज आहे. फिल्म इंडस्ट्रीत डिनरचा अर्थ आहे माझ्याकडे ये बेबी असं शर्लिननं एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिला अशा खूप ऑफर आल्या परंतु तिनं साऱ्या नाकारल्या असंही ती म्हणाली. हाही एक मोठा वाद होता.