नागपूरात भरदिवसा दगडाने ठेचून गुंडाचा खून

नागपूर : वृत्तसंस्था – नागपूर शहरात गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसत आहे. नागपूरातील हत्यांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी पुन्हा एकदा नागपूरमध्ये खळबळजनक घटना घडलीय. एका गुंडाची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. धंतोलीतल्या तकीया भागात ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

हत्या झालेल्या गुंडांचे नाव नितीन कुलमेथे असं आहे. नितीन हा गुंड असून त्याच्यावर एका हत्येचा आरोप होता. तसंच एका प्रकरणामुळे त्याला तडीपार करण्यात आलं होते. त्याची हत्या ही जून्या वादातून झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पंकज राऊत आणि मंगेश सोनवणे या दोन आरोपींनी हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यांच्या यापूर्वी वाद झाले होते. त्याच वादातून किंवा रागातून ही हत्या झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

नितीन तकीय भागात आला होता. तो तेथे येणार असल्याची माहिती आरोपींना पूर्वीपासूनच होती. तो येताच या आरोपींनी त्याला घेरलं आणि मारायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी त्याला मारण्यासाठी दगडांचा वापर केला. त्याला दगडांनी एवढं मारलं की त्यात मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पंकज आणि मंगेश या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

You might also like