धक्कादायक ! 250 मुलांचे लैंगिक शोषण करून डॉक्टरने अनेकांवर केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रान्समधून माणुसकीच्या आणि डॉक्टरकीच्या पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली असून या डॉक्टरवर 250 मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जोल ली स्कॉरनेक असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून मागील 3 दशकांपासून तो लहान मुलांबरोबर असे कृत्य करत असे. शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलांना गुंगीचे औषध देऊन तो हे कृत्य करत असे.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षांपूर्वी या डॉक्टरला अत्याचार करतानाचे फोटो काढल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र 2017 पर्यंत त्याला वैद्यकीय सेवा करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र 2017 मध्ये देखील त्याला 4 आणि 6 वर्षांच्या मुलांवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

याप्रकरणात फ्रान्सच्या सरकारने लक्ष घातले असून यामागे मोठे स्कँडल आहे कि नाही याचा शोध घेतला जात आहे. मात्र या डॉक्टरने मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपांचे खंडन केले असून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. तपासात पोलिसांनी एक डायरी जप्त केली असून यामध्ये 250 मुलांवर अत्याचार करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या डॉक्टरच्या वकिलांनी त्याचा बचाव करताना म्हटले कि, डायरीतील सर्व मजकूर हा काल्पनिक असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर या मुलांचा तपास केला जात असून पोलीस देखील यामुळे हैराण झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like