केवळ IPS सज्जनार नाही तर ‘हे 6 आहेत देशातील टॉपचे एन्काऊंटर ‘स्पेशालिस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. हा एन्काऊंटर राष्ट्रीय महामार्ग – 44 च्या जवळ झाला. त्यानंतर साइबराबाद पोलीस कमिश्नर सज्जनार यांचे सोशल मिडियावर कौतूक होताना दिसत आहे. त्यांना एन्काऊंटर मॅन अशा नावाने ओळखले जाते. देशात त्यांच्यासारखे असे अनेक एन्काऊंटर मॅन आहेत.

1. सचिन वाजे (मुंबई पोलीस), एन्काऊंटर – 63
सचिन हिंदूराव वाजे यांनी 1990 पोलिसात आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि 2007 साली नोकरी सोडली. ते महाराष्ट्रातील सर्वात चर्चित एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते.

2. दया नायक (मुंबई पोलीस), एन्काऊंटर – 83
दया नायक हे 1995 ला मुंबई पोलीसमध्ये दाखल झाले. तेव्हापासून त्यांनी 80 गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे. मुंबईच्या डिटेक्शन यूनिटचा भाग असलेले दया नायक यांना 2006 मध्ये उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या आणि लाच घेण्याच्या आरोपाखाली सस्पेंड करण्यात आले होते.

3. स्वर्गीय विजय साळसकर (मुंबई पोलीस), एन्काऊंटर – 90
विजय साळसकर यांनी मुंबई पोलिसात असताना 83 गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले होते. 2008 साली मुंबई दहशतवादी हल्ल्यात दोन हात करताना ते शहीद झाले.

4. रविंद्र आंग्रे (मुंबई पोलीस) एन्काऊंटर – 50
रविंद्र आंग्रे यांनी ठाण्याच्या संघटीत माफिया संपवण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी सुरेश गॅंगला पूर्णता संपवले होते.

5. प्रफुल भोसले (मुंबई पोलीस), एन्काऊंटर – 90
प्रफुल भोसले यांना आपल्या तपासासाठी तसेच गुन्हेगारांचे एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाते. गुन्हेगारांमध्ये त्यांची दहशत आहे. एक जेंटलमेन अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रफुल यांनी 85 कुख्यात गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे.

6. प्रदीप शर्मा (मुंबई पोलीस), एन्काऊंटर – 113
मुंबई पोलीसमधील शूर अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये प्रदीप शर्मा यांचा समावेश होतो. त्यांनी आतापर्यंत 104 कुख्यात गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे. याशिवाय 312 गुन्हेगारांना यमसदनी धाडण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे.

Visit : Policenama.com