‘ही’ आहे टॉप 5 ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ लॅपटॉची यादी, किंमत 30 हजारांपेक्षा देखील कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणामुळे बहुतेक सर्वच कार्यालयांतील कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे सल्ला देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लोकांना काम करण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता असते. दरम्यान, जर तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्या 5 लॅपटॉपविषयी माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि स्पेसिफिकेशन्सही चांगले आहेत.

1. HP CHROMEBOOK 14
हे विंडोज ऐवजी क्रोम ओएस वर चालते. ज्यांना वेब सर्फिंग, मेल चेक आणि व्हिडिओ पाहणे यासारखे काम करायचे आहे त्यांच्यासाठी हे अधिक चांगले आहे. यात 14 इंचाचा (1366 एक्स 768) डिस्प्ले, 1.4GHz, इंटेल सेलेरोन एन 3350 प्रोसेसर आणि इंटेल एचडी ग्राफिक्स 500 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हे फ्लिपकार्टकडून 22,990 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकते.

2. LENOVO IDEAPAD S145
हा लॅपटॉप 15.6 इंचाचा (1920 एक्स 1080) डिस्प्लेसह येतो आणि विंडोज 10 होमवर चालतो. बजेटमध्ये बेसिक लॅपटॉप हव्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे बरेच चांगले आहे. यात 8 व्या जनरल इंटेल कोर ™ i7-8565u प्रोसेसर आहे. फ्लिपकार्टकडून 25,990 रुपयांमध्ये ते खरेदी करता येऊ शकते.

3. LENOVO IDEAPAD 330S
हा लॅपटॉप क्लासी डिझाइन, सॉलिड बिल्ड, क्रिस्प नॉन-ग्लॉसी डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसह आला आहे. यात 8 व्या-जनरल इंटेल कोअर सीरिज प्रोसेसर देखील आहे. त्याचे बेस मॉडेल 4 जीबी रॅम आणि 1 टीबी एचडीडी-आधारित स्टोरेजमध्ये आहे. त्याची कार्यक्षमता बर्‍यापैकी डिसेंट आहे. फ्लिपकार्टकडून 24,990 रुपयांमध्ये ते खरेदी करता येऊ शकते.

4. LENOVO IDEAPAD 330
हा लॅपटॉप आयडिया पॅड 330 एस ची ऑल-प्लास्टिक वर्जन आहे. स्पीडसाठी, आपण त्याचे 8 जीबी रॅम व्हेरियंट निवडू शकता. हे विंडोज 10 होम वर चालते आणि 14 इंच (1920 x 1080) डिस्प्लेसोबत येतो. यात 7 व्या जनरेशचा एएमडी ए 9-9425 एपीयू प्रोसेसर आहे. हे अ‍ॅमेझॉनवर 26,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

5. HP 250 G5
या एचपी लॅपटॉपमध्ये बरेच चांगले हार्डवेअर उपलब्ध आहे. त्याची बिल्ड क्विलिटी चांगली आहे आणि त्याचे वजन 2 किलोपेक्षा कमी आहे. यात 2 GHz Intel® Core™ i3-6006U प्रोसेसर आणि इंटेल एचडी ग्राफिक्स 520 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हे विंडोज 10 होम 64 वर चालते. हे अ‍ॅमेझॉनकडून 28,800 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.