Top Indian Billionaires | भारतात किती लोकांकडे आहेत 100 कोटींपेक्षा जास्त, जाणून घ्याल तर व्हाल हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Top Indian Billionaires | भारतात 100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या (Top Indian Billionaires) भरपूर आहे. इतक्या संपत्तीचे सकल उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या 2020-21 मध्ये 136 होती. 2019-20 मध्ये अशा लोकांची संख्या 141 आणि 2018-19 मध्ये 77 होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी राज्यसभेत सांगितले की, मागील 3 वर्षादरम्यान प्राप्तीकर विभागात फाईल करण्यात आलेल्या प्राप्तीकर माहितीमध्ये 100 कोटी रुपये (एक अरब रुपये) पेक्षा जास्तचे सकल उत्पन्न दर्शवणार्‍या व्यक्तींची संख्या 2020-21 मध्ये 136 होती.

Lockdown दरम्यान देशात अरबपतींच्या संख्येत वाढ

त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, लॉकडाऊन दरम्यान देशात अरबपतींची संख्या वाढली आहे का. अर्थमंत्री म्हणाल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडे (CBDT) उपलब्ध माहितीनुसार,
प्रत्यक्ष कर (Direct Taxes) अंतर्गत खरबपती शब्दाची कोणतीही वैध आणि प्रशासकीय व्याख्या नाही.

मालमत्ता कर एप्रिल 2016 मध्ये बंद केला

त्यांनी म्हटले की, मालमत्ता कर एप्रिल 2016 मध्ये बंद करण्यात आला आहे.
यासाठी सीबीडीटी कोणत्याही व्यक्तीगत करदात्याच्या संपूर्ण मालमत्तेची माहिती ठेवत नाही.

भारतात 27 कोटी गरीब

गरीबी अंदाजानुसार, सध्या तेंडुलकर समिती कार्यप्रणालीनुसार भारतात दारिद्रय रेषेच्या
खाली राहणार्‍या व्यक्तींची संख्या 2011-12 मध्ये 27 कोटी (21.9 टक्के) अंदाजे होती.
सरकारने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’वर जोर देण्यासह विविध योजना सुरू केल्या आहेत.
ज्यांचे लक्ष्य लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे आणि अपेक्षित गतीमान विकास करणे आहे.

 

Web Title : Top Indian Billionaires | Top indian billionaires number of billionaires in india stands at 136 in fy21 says nirmala sitharaman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Forest | शास्त्रज्ञांनी 50 वर्षांपूर्वी लावले होते ‘हे’ जंगल, आता येथे जाण्याच्या नावाने सुद्धा लोकांच्या उरात भरते धडकी

Pune Corporation | 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भातील याचिकेचा खर्च महापालिकेने करावा; भाजप नगरसेवकांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर

PM Modi | ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी केले PM मोदींचे कौतूक, म्हणाले – ‘चीनसाठी भारत एकमेव उत्तर’