Top Indian IT Companies | टॅलेंट हायर करण्याची स्पर्धा, IT कंपन्या 1 लाखापेक्षा जास्त फ्रेशर्सला देणार नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Top Indian IT Companies | जर तुम्ही फ्रेशर्स आहात तर तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. देशातील टॉप आयटी कंपन्यामध्ये (Top Indian IT Companies) टेक्नॉलॉजी टॅलेंट हायर करण्याची स्पर्धा सुरू आहे. भारताच्या मोठ्या आयटी कंपन्या टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीस (HCL) कडून या आर्थिक वर्षात संयुक्त प्रकारे 1 लाखापेक्षा जास्त फ्रेशर्सला नोकर्‍या देण्याची अपेक्षा आहे.

Infosys

इन्फोसिस (Infosys) ने बुधवारी म्हटले की, ते यावर्षी सुमारे 45,000 फ्रेशर्सला कंपनीत हायर करतील. कारण एट्रिएशन रेट (कंपनी सोडून जाण्याचा कर्मचार्‍यांचा दर) मध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.
इन्फोसिसचे सीओओ (UB) प्रवीण राव यांनी सांगितले की, मार्केटमधील सर्व संभाव्य शक्यतांचा लाभ घेण्यासाठी आम्ही कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्राम यावर्षी वाढवून 45,000 करणार आहोत.
याशिवाय कर्मचार्‍यांचे आरोग्य आणि वेलनेस उपाय, रिस्किलिंग प्रोग्राम आणि करियर ग्रोथच्या संधीसह इतर गरजांकडे लक्ष देणार आहोत. (Top Indian IT Companies)

TCS

टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टीसीएसने शुक्रवारी म्हटले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहित 35 हजार नवीन ग्रॅच्युएटला नियुक्त करण्याची योजना आहे.
कंपनीने मागील सहा महिन्यापूर्वीच 43,000 ग्रॅज्युएटला कामावर ठेवले आहे.
सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एट्रिएशन रेट वाढून 11.9% झाला, जो मागील तिमाहीत 8.6% होता.

Wipro

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो (Wipro) चे सीईओ आणि एमडी थिएरी डेलापोर्टने आपल्या दुसर्‍या तिमाहीच्या अर्निंग अपडेट दरम्यान म्हटले की,
दुसर्‍या तिमाहीत 8,100 तरूण सहकारी कॅम्पसमधून सहभागी झाल्यानंतर कंपनीने आपले फ्रेशर हायरिंग दुप्पट केले आहे.

 

HCL Tech

एचसीएल टेक्नॉलॉजीसने गुरुवारी म्हटले की, कंपनी यावर्षी जवळपास 20,000-22,000 फ्रेशर ग्रॅज्युएट्सला हायर करण्याची तयारी करत आहे आणि पुढील वर्षी 30 हजार फ्रेशर्सला सहभागी करण्याची योजना बनवत आहे. (Top Indian IT Companies)

 

Web Title : Top Indian IT Companies | Competition for hiring talent, IT companies will give jobs to more than 1 lakh freshers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shivsena Dasara Melava | छापा-काटा ! हिंमत असेल तर पाडून दाखवा; CM उद्धव ठाकरेंचे भाजपला ‘आव्हान’

Shiv Sena Dussehra Melawa | ‘…कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला झालो असतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ)

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण…’ (व्हिडीओ)