ISRO च्या वैज्ञानिकांनी खासदारांसमोर वाजवली ‘बासरी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) अवकाशात उपग्रह आणि रॉकेट पाठवून जगात देशाचे नाव रोशन केले आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी एका बैठकीदरम्यान खासदारांसमोर बासरी वाजवून सर्वांना भुरळ घालत मोहित केले. वैज्ञानिकाने बासरी वाजवल्याबद्दल त्यांचे सगळ्यांकडून खूप कौतुक केले जात आहे.

बंगळुरु येथे घेण्यात आलेल्या भारतीय संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सॅटेलाईट सेंटरचे डायरेक्टर पी. कुन्हीकृष्णन यांनी बासरी वाजवून सगळ्यांची मनं जिंकली. या बैठकीत इस्रोचे प्रमुख सिवन देखील उपस्थित होते. कुन्हीकृष्णन यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचा व्हिडिओ कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये पी कुन्हीकृष्‍णन खासदारांसमोर बासरी वाजवताना दिसत आहेत. जयराम रमेश यांनी ट्विट शेअर करत सांगितले की पी कुन्हीकृष्‍णन फक्त एक वैज्ञानिक नसून ते एक उत्तम बासरीवादक पण आहेत. स्थायी समितीच्या बैठकीची त्यांनी सदाबहार वटापी गणपतिम भजे ची धून वाजवून सांगता केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/