लाहोरमध्ये खलिस्तानी नेता ‘हॅपी PhD’ ची गुरूव्दाराजवळ गोळ्या घालून हत्या, शिवसेना – RSS नेत्यांच्या हत्येचा होता आरोपी

लाहोर : वृत्तसंस्था – पंजाबमधून पळून जाऊन पाकिस्तानात गेलेला खलिस्तानी नेता हप्पी पीएचडी ऊर्फ हरमीत सिंह याची लाहोरमधील गुरुद्वाराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी प्राथमिक माहितीनुसार अंमली पदार्थाच्या तस्करीमधील पैशातून झालेल्या वादातून ही हत्या करण्याचा आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

हरमीत सिंह हा पंजाब पोलिसांच्या मोस्ट वांटेड लिस्टमधील एक महत्वाचा फरारी गुन्हेगार होता. अमृतसरमध्ये हैंड ग्रेनेड हल्ल्याचा कट रचणे आणि पंजाबमधील आरएसएस आणि शिवसेना नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याचबरोबर पाकिस्तानातून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करणे आणि खलिस्तान समर्थक अतिरेक्यांच्या स्लीपर सेल आणि टेरर मॉडेल तयार करण्याचा तो प्रयत्न करीत होता.

हरमीत सिंह स्वत:ला खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख असल्याचे सांगत होता. आयएसआय च्या इशाऱ्यांवर तो गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये राहत होता. आणि तेथे राहून तो पंजाबमधील नेटवर्कमार्फत अंमली पदार्थांची भारतात तस्करी करीत होता. अतिरेक्यांचे टेरर मॉड्युल आणि स्लीपर सेलची उभारणी करीत होता. याच अंमली पदार्थाच्या तस्करीतील पैशांच्या देवाणघेवाणीवरुन स्थानिक टोळीने लाहोरमधील गुरुद्वाराबाहेर हरमीत सिंह याच्यावर गोळीबार करुन त्याची हत्या केली आहे.