इराणचे सुप्रीम नेते अयातुल्लांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटलं ‘जोकर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमानी (Ayatollah Ali Khamani) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले की, वेळ आल्यास अमेरिका (USA) इराणच्या पाठीत विषारी सुऱ्याने वार करेल. खमानी यांनी २०१२ नंतर प्रथमच शुक्रवारी नमाजला संबोधित करताना ट्रम्प यांना जोकर (Joker) म्हटले. ते म्हणाले की, ट्रम्प इराणच्या जनतेला पाठिंबा दर्शविण्याचा फक्त दिखावा करतात. या दरम्यान ते असेही म्हणाले की, दुःखद युक्रेनीयन विमान दुर्घटनेमुळे कुड्स फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी (Qasem Soleimani) यांची शहादत कमी ठरत नाही.

‘इराणला गुडघे टेकण्यास भाग पाडण्याची शक्ती पाश्चिमात्य देशांमध्ये नाही’
अयातुल्ला अली खमानी म्हणाले, ‘कासिम सुलेमानी यांच्या प्रेतयात्रेच्या दरम्यान हे स्पष्ट झाले की इराणचे लोक इस्लामिक रिपब्लीक (Islamic Republic) चे समर्थन करतात. अमेरिकेने इस्लामिक स्टेट समूहाविरुद्ध लढणाऱ्या सर्वात प्रभावी कमांडरला भ्याडपणाने ठार मारले. ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशांमध्ये इराणच्या लोकांना गुडघ्यावर आणण्याइतकी शक्ती नाही. इराण बोलणी करण्यास तयार आहे, परंतु अमेरिकेबरोबर नाही. दरम्यान बोलताना अयातुल्ला अली खमानी यांनी सुलेमानींचे कौतुक केले.

विमान अपघाताला एक भयंकर आणि दुःखद घटना म्हटले
खमानी यांनी युक्रेन (Ukraine) च्या विमानाला चुकून खाली पाडल्याचा घटनेस भयानक अपघात असे वर्णन केले. ते म्हणाले की या विमान अपघातामुळे (Plane Crash) इराणच्या लोकांना जेवढे दुःख झाले तितकाच आनंद शत्रूंना झाला आहे. काही लोकांची इच्छा आहे की या घटनेनंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांच्या महान त्यागाला विसरून जावे. युक्रेनच्या विमान अपघातात जवळपास १७६ लोक ठार झाले होते. त्यातील बहुतेक लोक हे इराण आणि कॅनडाचे नागरिक होते. खमानी हे १९८९ पासून देशाचे सर्वोच्च नेते आहेत. सर्व प्रमुख निर्णयांमधील अंततः अंतिम निर्णय हा त्यांचाच असतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like