जो बिडेन आणि कमला हॅरिस यांनी दिल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा !

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन आणि त्यांच्या सहकारी (उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार) भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी शनिवारी नवरात्र सुरू झाल्याबद्दल हिंदूं बांधवांना शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा वाईटावर चांगलेपणाचा विजय प्राप्त होईल, अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली.

बिडेन यांनी शनिवारी ट्विट केले की, हिंदू सण नवरात्रोत्सव सुरू झाला असून यानिमित्त अमेरिका आणि जगभरातील उत्सव साजरा करणार्‍या सर्वांना माझ्याकडून आणि जिलकडून हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा वाईटावर चांगलेपणाचा विजय प्राप्त होईल आणि सर्वांना पुन्हा नवीन सुरूवात करण्याची संध्या मिळावी, अशा शुभेच्छा जो बिडेन यांनी दिल्या.

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला होणार्‍या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बिडेन (77) हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात जो बिडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी बायडेन व्हाइट हाऊस आणि त्यांच्या अधिकृत निवासस्थानी दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेत असत.