Top Return Stocks | एक वर्षात 4 पट झाले पैसे, ‘या’ 7 शेयरने दिला चांगला रिटर्न; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Top Return Stocks | काही दिवस मंदावल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. समोर अर्थसंकल्प (Budget) असून तोपर्यंत बाजारात तेजी राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव काही क्षेत्रांवर (Sector) दिसत असला तरी या सगळ्यामध्ये गेल्या वर्षभरात सर्व समभागांनी उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. ज्यांनी एका वर्षात उत्कृष्ट रिटर्न दिला अशा काही शेयरबद्दल जाणून घेऊयात. (Top Return Stocks)

 

1. दीपक नायट्रेट : Deepak Nitrite
या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. दीपक नियट्रेटचा शेअर एक वर्षापूर्वी 18 जानेवारीला 1011 रुपये होता, जो आता 17 जानेवारी 2022 ला 2658 रुपये झाला आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 3000 रुपयांपेक्षा जास्त आहे. या समभागाने एका वर्षात 162 टक्के रिटर्न दिला आहे.

 

2. अदानी ग्रीन : Adani Green
अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांनी गेल्या एका वर्षात उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. पण अदानी ग्रीन एनर्जीचा वाटा एका वर्षात दुप्पट झाला आहे. गेल्या वर्षी 18 जानेवारीला अदानी ग्रीनचा शेअर 949 रुपयांवर होता, जो 17 जानेवारी 2022 रोजी 1827 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.

 

3. डिक्सन टेक्नॉलॉजीज : Dixon Technologies
या कंपनीच्या शेअरने एका वर्षात उत्कृष्ट रिटर्नही दिला आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर 17 जानेवारीला 5,388 रुपयांवर बंद झाला. तर एक वर्षापूर्वी म्हणजेच 18 जानेवारी 2021 रोजी त्याच्या शेअरची किंमत 3000 रुपयांच्या जवळपास होती. (Top Return Stocks)

4. टाटा मोटर्स : Tata Motors
लार्ज कॅप कंपनी टाटा मोटर्सने एका वर्षात चांगला रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना खूश केले आहे. टाटा मोटर्सचा शेअर 17 जानेवारीला 524 रुपयांवर बंद झाला. तर एक वर्षापूर्वी 18 जानेवारी 2021 रोजी या शेअरची किंमत 245 रुपये होती. म्हणजेच एका वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे.

 

5. स्टेट ऑफ बँक इंडिया : State of Bank India (SBI)
दिग्गज सरकारी बँक एसबीआयच्या स्टॉकने देखील उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. गेल्या वर्षी 18 जानेवारी रोजी या बँकेचा शेयर 294 रुपये होता, तो आता 514 रुपये झाला आहे.

 

6. केपीआयटी टेक्नॉजीज : KPIT Technologies
या स्टॉकने एका वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे. सध्या हा शेयर 732 रुपये आहे.
पण वर्षभरापूर्वी या शेयरची किंमत केवळ 132 रुपये होती. या शेयरने एका वर्षात 453 टक्के रिटर्न दिला आहे.

 

7. अदानी पॉवर : Adani Power
अदानी समूहाच्या या शेयरने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
या स्टॉकची किंमत एक वर्षापूर्वी 18 जानेवारी 2021 रोजी 53 रुपये होती, जी आता 115 रुपये झाली आहे.

 

 

Web Title :- Top Return Stocks | multibagger stocks last one year return double to 4 times during covid situation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! ऑफिसमध्ये घुसून तरुणीवर चाकू हल्ला, बारामतीमधील आज सकाळी 10.30 ची घटना

 

Post Office Account | पोस्ट ऑफिसमधील अकाऊंट बंद करायचे असेल तर सांभाळून ठेवा ‘हे’ कागदपत्र; जाणून घ्या

 

Dhanush-Aishwarya Divorce | दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या हे पॉवर कपल होणार विभक्त