Top Ten MP in India | देशातील टॉप-टेन खासदारांच्या यादीत महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश, सुप्रिया सुळे ‘अव्वल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील टॉप टेन खासदारांची (Top Ten MP in India) यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा (Top Ten MP in India) समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Maval MP Srirang Barane) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

देशातील टॉप-टेन खासदारांमध्ये (Top Ten MP in India) महाराष्ट्राने बाजी मारली आहे. त्यात शिवसेनेचे (Shivsena) तीन तर राष्ट्रवादीचा (NCP) एक खासदार आहे. याशिवाय तामिळनाडूतील दोन, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, झारखंड येथील प्रत्येकी एकेक खासदाराचा यादीत समावेश आहे. या खासदारांच्या यादीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे (MP Shrikant Eknath Shinde) आणि राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांचा समावेश आहे. श्रीरंग बारणे दुसऱ्या, श्रीकांत शिंदे 8 व्या तर राहुल शेवाळे 9 व्या क्रमांकावर आहेत.

देशातील खासदारांच्या संसदेतील कामगिरीवरून ही टॉप टेन यादी जाहीर करण्यात आली आहे.
अहवालामध्ये विविध निकषांवर संसदेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करून त्यानुसार ही
आकडेवारी जाहीर करण्यात येते. तसेच सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे प्रथम
क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक खासगी विधेयक मांडणाऱ्या खासदारांमध्ये गोपाल शेट्टी (MP Gopal Shetty)
नंबर वनवर आहेत.

Web Title :- Top Ten MP in India | Baramati NCP MP supriya sule got 1st place in top 10 mps list in india Maval MP Srirang Barane Shrikant Eknath Shinde Mumbai Rahul Shewale Gopal Shetty

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन