Flashback 2019 : वर्षभरात भारतीयांनी ‘हे’ 10 प्रश्न ‘गुगल’वर केले सर्वाधिक ‘सर्च’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हे वर्ष आता संपणार असून नव्या वर्षाचे आगमन होईल. 2019 हे वर्ष तसे बऱ्याच विशेष घडामोडींचे राहिले. राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रिडा या सर्वातून या वर्षात मोठी भर पडली. त्यानुसार लोकांना अनेक बाबी गुगलवर सर्च केल्या. परंतू गुगलवर असे कोणते प्रश्न सर्वाधिक सर्च झाले याची कल्पना तुम्हाला कदाचितच नसेल. परंतू गुगलला What Is…असे म्हणतं अनेक प्रश्न विचारण्यात आले. भारतीयांनी या वर्षात गुगलला काय काय प्रश्न विचारले त्यातील काही टॉप प्रश्न आपण पाहूयात.

1. What Is National Register Of Citizens Of India? 
हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक विचारण्यात आला. लोकांना जाणून घ्यायचे होते की एनआरसी म्हणजे नेमकं काय? ही कल्पना तशी जुनी आहे. 1951 मध्ये ही कल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली होती. सध्याची प्रक्रिया ही 1951 च्या एनआरसीचे अद्यावतीकरण आहे असे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केली होती. आसाममध्ये लागू करण्यात आलेले एनआरसी संपूर्ण देशात लागू करण्याची चर्चा जोर धरत आहे.

2. What Is Surgical Strike? 
सर्जिकल स्ट्राइक वर अधारित सिनेमा आल्यानंतर हा प्रश्न अनेकदा गुगलला विचारण्यात आला. सर्जिकल स्ट्राइल झाल्यानंतर याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यातील एक हा प्रश्न होता, अर्थात उरी सिनेमा आल्याने हा प्रश्न जास्त सर्च झाला.

3. What Is Article 15? 
हा प्रश्न अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुगलला विचारला, तुम्हाला ही कदाचित आर्टिकल 15 महित नसेल. यावर आधारित सिनेमा आर्टिकल 15 आल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात सर्च झाले. उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणावरुन प्रेरित असलेल्या आर्टिकल 15 या चित्रपटात आयुषमान खुराणाने प्रमुख भूमिका साकारली आहे. जातिव्यवस्थेवरील वास्तव मांडण्याचा या चित्रपटातून प्रयत्न केला गेला.

4. What Is The Ayodhya Case? 
9 नोव्हेंबरला रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या वादावरुन सर्वोच्च न्यायालयतील ऐतिहासिक खटल्यावर निकाल आहे. अयोध्येतील 2.77 एकर जमीनीवरुन हा वाद होता. निकालानुसार या जागेवर राममंदिर उभारण्यात यावे आणि मशिदीसाठी दुसरी जागा सरकारने उपलब्ध करुन देण्यात यावी. हा खटला नेमका काय यावर गुगल सर्च करण्यात आले.

5. What Is The DLS Method In Cricket? 
भारतीय आणि क्रिकेट हे नातं तसं अतूट. या वर्षी एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा पार पडली. यातून भारतीय संघ बाहेर पडला. यंदाचा पावसाळा देखील चांगलाच लांबला. त्यामुळे क्रिकेटवर सावट होतं ते पावसाचं. त्यामुळे डीएसएल काय हे गुगल सर्चमध्ये टॉपवर होते.

6. What Is E-Cigarette? 
या सिगरेटवर सरकारकडून बंदी घालण्यात आली. त्यानंतर भारतात ई सिगारेट विक्रीवर बंदी आली. याचं फॅड शाळकरी मुलांमध्ये होतं. परंतु आता या सिगारेटच्या आयात निर्यातीवर, वाहतूकीवर, साठवणूकीवर, जाहिरातीलवर बंद आणण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न गुगलला अनेकांनी विचारुन आपल्या शंकांचे निरसरण करु घेतले.

7. What Is Howdy Modi? 
सप्टेंबर महिन्यात गुगलवर काय ट्रेंडमध्ये होतं तर ते हाउडी मोदी. पंतप्रधान मोदी ह्युस्टनमध्ये दौऱ्यावर असताना गुगलवर सर्वात जास्त ट्रेंडमध्ये होते. या कार्यक्रमाला 50 हजारापेक्षा जास्त अमेरिकी भारतीय उपस्थित होते. हा अमेरिकेतील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक होता. त्यामुळे हाउडी मोदी म्हणजे काय हे गुगलला अनेकांनी सर्च केले. हाउडी हा नवा शब्द समोर आल्याने या शब्दाची चर्चा गुगलवर चांगलीच रंगली होती.

8. What Is A Black Hole? 
एप्रिल महिन्यात वैज्ञानिकांना विश्वातील कृष्णविवरची पहिली प्रतिमा शोधण्यात यश आलं. काळासर गाभा आणि पांढऱ्या तप्त वायूची नारंगी ज्वाला अशी ही प्रतिमा होती. त्यामुळे हे नक्की काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला. त्यानंतर हा प्रश्न अनेकांनी गुगलला विचारला.

9. What Is Exit Poll? 
हे वर्ष राजकीय घडामोडींचे राहिले, कारण या वर्षात देशात लोकसभेचे निवडणूका पार पडल्या. यंदा देखील मोदी सरकारने पुन्हा देशात सत्ता स्थापन केली. निवडणूकींची निकाल समोर येण्याआधी विविध संघटनांकडून एक्झिट पोल काढला जातो. त्याने अंदाज बांधता येतो की कोणते सरकार सत्तेत येईल. यामुळे हा एक्झिट पोल गुगलवर अनेकांनी सर्च केला. त्यामुळे गुगलच्या टॉप सर्चमध्ये हा प्रश्न राहिला.

10. What Is Article 370? 
ऑगस्ट महिना देशाच्या इतिहासातील मोठा महत्वाचा महिना राहिला. कारण या महिन्यात मोदी सरकारने राज्यघटनेतील कलम 370 रद्द केलं. जम्मू काश्मीरला या कलमामुळे मिळालेल्या विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आणि जम्मू काश्मीर आणि लेह लडाख हे दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. त्यामुळे हा निर्णय चांगलाच चर्चात राहिला. म्हणूनच हा प्रश्न गुगलवर टॉप सर्चमध्ये राहिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/