Aadhar Card ला लॉक-अनलॉक करण्यासाठी वापरा ‘ही’ पद्धत, माहितीच्या चोरीची नाही राहणार ‘चिंता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आधारकार्ड आजच्या घडीला भारतीय नागरिकांच्या ओळखीचं प्रमुख साधन बनलं आहे. 12 अंकांची ही विशिष्ट ओळख असणारी संख्या अनेक सेवांसाठी उपयोगाची आहे. हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे यातील आपली वैयक्तिक माहिती चोरीला जाईल कि काय अशी भीती नेहमी प्रत्येकाला वाटत असते. कोणी दुसरी व्यक्ती आपल्या आधार नंबरचा दुरुपयोग करेल कि काय असं वाटत राहतं. प्रत्येक आधारकेंद्रावर आपल्या आधारकार्डला लॉक-अनलॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ही सुविधा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक माहितीचे जतन करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

आधार नंबर लॉक करण्याचे फायदे : आधार नंबरला एकदा लॉक केल्यानंतर त्या आधार नंबर वरून कोणीही बायोमॅट्रिक मशीन वापरून किंवा डेमोग्राफीक चा वापर करून तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी करू शकणार नाही. यामुळे आधार नंबरची असणारी काळजी दूर होईल. त्यासाठी तुम्हाला फक्त केवायसी साठी 16 अंकी वर्चुअल आयडीची गरज लागेल. आधार कार्ड ला अनलॉक केल्यानंतरच तुम्ही तुमच्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

आधार नंबरला लॉक कसं करायचं?

1. UIDAI च्या वेबसाइटवरून : जर तुम्हाला आधार नंबर लॉक करायचा असेल तर तुम्ही UIDAI च्या (https://resident.uidai.gov.in/) या वेबसाइटवरून लॉग ऑन करू शकता.

2. त्यानंतर My Aadhaar टॅब मध्ये Aadhar Services असा पर्याय दिसेल

3. त्यानंतर lock-unlock Biometrics वर क्लीक करा

4. आता तुमचा 12 अंकांचा आधार नंबर टाका

5. आता send otp वर क्लीक करा

6. ओटीपी टाकल्यावर तुम्हाला लॉक करण्यासाठी पर्याय दिसेल

7. लॉक वर क्लीक केल्यावर तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक होईल.

याठिकाणी लक्षात ठेवा की, आधार नंबर लॉक करण्याआधी व्हर्चुअल कोड जनरेट करून घ्या.