कामाची गोष्ट ! तुमचं Aadhaar कार्ड पुन्हा ‘रिप्रिन्ट’ झालंय की नाही, ‘स्टेटस’ ऑनलाइन पाहू शकता, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) च्या माध्यमातून आपण आधार कार्डशी संबंधित सेवांचा लाभ ऑनलाईन घेऊ शकता. याशिवाय आधारशी संबंधित अशा अनेक सुविधा आहेत ज्यांचा ऑनलाईन लाभ घेता येतो. यामध्ये आधार कार्डमधील अपडेट, नाव, पत्ता बदलण्याबाबत अनेक माहिती समाविष्ट आहे. याशिवाय, वापरकर्ते त्यांच्या आधार पुनर्प्रिंटची स्थिती ऑनलाईन तपासू शकतात. आधार-नोंदणीकृत व्यक्ती यूआयडीएआय वेबसाइट, uidai.gov.in, किंवा मोबाइल अॅपद्वारे (mAadhaar) या सुविधा ऑनलाइन चेक करू शकतात. या सेवेचा वापर करून, वापरकर्ता आधार क्रमांकासह 28-अंकी सेवा विनंती क्रमांक प्रविष्ट करुन त्यांच्या आधारची स्थिती तपासू शकतो.

प्रत्येक आधार रीप्रिंटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते आणि ते वापरकर्त्याच्या घरी स्पीड पोस्टद्वारे पाठविले जाते.

आधार रीप्रिंटची स्थिती कशी तपासायची

युआयडीएआय (UIDAI) पोर्टलवर जा आणि My Aadhaar सेक्शन अंतर्गत Check Aadhaar reprint status पर्याय निवडा.

पुढील प्रक्रियेसाठी, वापरकर्त्यांना डिटेलस भरल्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक आणि 28 अंकी सेवा विनंती क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.

आवश्यक माहिती योग्यरित्या भरल्यानंतर, “चेक स्टेटस” (check status) बटणावर क्लिक करा.

यानंतर आपण पुढील पृष्ठावर जाल, जेथे आपण आधार रीप्रिंट स्टेटस पाहू शकता.

तुम्हाला हवे असल्यास आपण mAadarar या अॅपचा वापर करून देखील सेवांचा लाभ घेऊ शकता.

आधार कार्डवर चुकीचा पत्ता छापल्यानंतर कार्डधारकाने त्याच्या आधार कार्डमधील पत्ता बदलणे आवश्यक आहे. घर बदलल्यानंतरही आधार कार्डमध्ये नवीन पत्ता अपडेट करावा लागतो. कार्डधारक त्यांच्या घरातूनच आधार कार्डमधील पत्ता ऑनलाईन मार्गाने अपडेट करू शकतात. परंतु आधारसह नोंदणीकृत सक्रिय मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त आपण आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करू शकता. एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाची गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.