दररोज फक्‍त 7 रूपये बचत करून 5000 ची पेन्शन मिळवा, जाणून घ्या मोदी सरकारच्या ‘या’ योजनेबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मोदी सरकारने नवीन योजना आणली आहे. वृद्धावस्थेत या व्यक्तींना मदत होण्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये अटल पेंशन योजना सुरु केली होती. यामध्ये पैसे गुंतवणे खूप फायदेशीर असून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तुम्हाला या योजनेची फार मोठी मदत होणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेत तुम्ही दररोज 7 रुपये वाचवून तुम्ही वयाच्या 60 वर्षानंतर तुम्ही दरमहा 5 हजार रुपये पेन्शन घेऊ शकता. हि योजना उत्त्पन्न कमी असणाऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील असंघटित कामगारांसाठी खूप फायदेशीर आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 40 वर्ष वयापर्यंतच्या व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. मात्र जे नागरिक आयकर भारत नाहीत ते देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात. यामध्ये ६० वर्ष झाल्यानंतर तुमच्या बचतीनुसार तुम्हाला 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

या योजनेविषयी अन्य महत्वाची माहिती

1) या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खाते किंवा आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

2) प्रत्येक महिन्याला तुम्हाला विशिष्ट राशी जमा करावी लागणार आहे. तुम्ही जितकी अधिक राशी जमा करणार तितकी अधिक पेन्शन तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार  आहे.

3) १८ ते ४० वर्ष वयापर्यंतच्या व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात. मात्र जे नागरिक आयकर भारत नाहीत ते देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात. त्याचबरोबर  कमीतकमी 20 वर्ष तुम्हाला या योजनेत पैसे भरावे लागणार आहेत.

4) या योजनेत मासिक, त्रैमासिक आणि सहामाही असे योगदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेतील व्यक्तीचा जर त्यापूर्वी मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्याच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.

visit: Policenama.com