खुपच कामाचा 15X15X15 वाला म्युच्युअल फंडांमध्ये गुंवतणूकीचा ‘फॉर्म्युला’, ‘धनवान’ बनवण्यात करेल तुमची मदत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :  कोणाला वाटत नाही की आपले आयुष्य सुखात जावे आणि भविष्यात कधी पैशांची अडचण भासू नये. पैशामुळे तुम्ही भौतिक सुविधांचा फायदा घेण्यास सक्षम असतात. तुमच्या पैशांमध्ये वाढ व्हावी म्हणून तुम्ही बचत करतात आणि बरीच अ‍ॅसेट क्‍लास मध्ये गुंतवणूक करता. तथापि, तज्ञांच्या मते दीर्घ कालावधीत इक्विटी इतर मालमत्ता वर्गाच्या तुलनेत बरेच चांगले उत्पन्न देतात. इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल गुंतवणूकीशी संबंधित 15X15X15 चा फॉर्मुला सांगणार आहोत जो तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी नक्कीच मदत करेल.

15X15X15 चा फॉर्मुला काय आहे?

कर तज्ज्ञ आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन म्हणाले की, 15X15X15 हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एक फॉर्मुला आहे. त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने 15 वर्षांसाठी इक्विटी म्युच्युअल फंडात 15,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि जर त्याला 15 टक्के चक्रवाढ रिटर्न मिळाला असेल तर गुंतवणूकीच्या शेवटी तुमच्या हातात एक कोटी रुपये असतील. म्हणजे जिथे तुमची एकूण गुंतवणूक 15 वर्षांत 27 लाख रुपये होती, तिथे रिटर्न सहित तुम्हाला 15 वर्षानंतर 1 कोटी रुपये परत मिळतील.

या फॉर्म्युल्यानुसार गुंतवणूकीची रक्कम 10 कोटी होईल

जैन म्हणतात की जर या फॉर्म्युल्याला आपण 15X15X30 नुसार केले, म्हणजेच गुंतवणूकीची वेळ दुप्पट केली आणि गुंतवणूकीची रक्कम आणि त्यावरील परतावा 15 टक्के चक्रवाढ प्रमाणे मानून चालले तर म्युच्युअल फंडामध्ये दरमहा केली जाणारी 15,000 रुपयांची गुंतवणूक 30 वर्षानंतर 10 कोटी रुपयांची होईल. गुंतवणूकीची मूळ रक्कम 54 लाख रुपये असेल.

श्रीमंत होण्यासाठी वेळ आवश्यक आहे चांगल्या वेळेची प्रतीक्षा नाही

जैन म्हणतात की एखाद्याने श्रीमंत होण्यासाठी चांगल्या वेळेची वाट पाहू नये. ‘जब जागो तभी सवेरा’ ही म्हण गुंतवणूकीच्या बाबतीत लागू होते. बाजाराची परिस्थिती काहीही असली तरी आपण आपली गुंतवणूक सुरू ठेवली पाहिजे. बाजाराचे एक चक्र असते, ज्यामध्ये ते खाली जाते आणि पुन्हा वर येते. अल्पावधीत, बाजाराच्या या हालचालीमुळे व्यापाऱ्यांना नफा-नुकसान मिळत असतो. परंतु गुंतवणूक म्हणून आपण केवळ आपल्या गुंतवणूकीचा कालावधी पाहिला पाहिजे. तुम्ही जितके जास्त इक्विटीमध्ये गुंतवणूक कराल तितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल.