Card Cloning : कसं होतं कार्डचं क्लोनिंग, कशामुळं आहे घातक, जाणून घ्या यापासून बचावाचे उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अनेक दिवसांपासून कार्ड क्लोनिंगची प्रकरणे समोर येत आहेत, परंतु कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कार्ड क्लोनिंगची वेगाने वाढ झाली आहे आणि तो एक मोठा धोका म्हणून उदयास आला आहे. कार्ड क्लोनिंगमुळे लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. क्रेडिट कार्डबद्दल बोलायचे म्हणले तर, क्लोनिंग किंवा स्किमिंग मध्ये, एक फसवणूक करणारा व्यक्ती आपल्या क्रेडिट कार्ड माहिती जसे की कार्ड नंबर, सीव्हीव्ही, पिन, एक्सपायरी डेट, नाव इत्यादी गोळा करतात. त्यानंतर ती माहिती नकली किंवा बनावट कार्डवर कॉपी करतात आणि त्यानंतर क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरूवात करतात.

कार्ड क्लोनिंग कसे करतात- कार्ड धारकाला माहित पडू नये म्हणून स्कॅनिंग स्लॉटसह डिव्हाइस वापरली जाते. हे मशीन पीओएस मशिनसारखे दिसते, ज्यामुळे कार्ड धारकाला काहीच कळत नाही. फसवणूक करणारे डिव्हाइसद्वारे ग्राहकांची क्रेडिट-डेबिट कार्ड स्वाइप करतात. फसवणूकीसाठी वापरल्या गेलेल्या या मशीन्समध्ये असे सॉफ्टवेअर असते, ज्यात 3 हजार कार्डांपर्यंतची माहिती ठेवता येते.

कार्डची माहिती स्कॅन करुन कॉपी केली जाते आणि नंतर कार्ड क्लोन करण्यासाठी एक्सपायर्ड झालेल्या, रिकाम्या किंवा चोरी झालेल्या कार्डवर कॉपी करता येते. क्लोन कार्डच्या मदतीने, फसवणूक करणारा क्रेडिट कार्ड धारकाच्या बँक खात्यात सहज पैशाचा व्यवहार करतो.

कसा यातून बचाव करावा- केंद्रीय बँक आरबीआयने मॅगस्ट्रिप कार्डऐवजी ईएमव्ही चिप-आधारित कार्ड वापरणे बंधनकारक केले आहे. ईएमव्ही कार्डमध्ये मायक्रोचिप असतात. जेव्हा कोणी हे कार्ड स्कॅन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा केवळ एनक्रिप्टेड माहितीच मिळते.

सार्वजनिक ठिकाणी कार्ड वापरताना, कॅमेरा लावलेला आहे का याची खात्री करा, जेणेकरून तुमचा कार्ड नंबर आणि इतर कार्ड माहिती कोणाकडेही जाऊ नये. आपण जेव्हा पॉस मशीनमध्ये कार्ड पिन प्रविष्ट करता तेव्हा ते आपल्या दुसऱ्या हाताने ते झाकले पाहिजे. आपण रेस्टॉरंट, पेट्रोल पंप किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पॉस मशीनमधून कार्ड स्वाइप करत असल्यास, मशीन योग्य प्रकारे तपासा. जर मशीन सामान्यपेक्षा भारी असेल तर दुसर्‍या मार्गाने पैसे देण्याचा विचार करा.

जर आपल्या कार्डची क्लोन झाली आणि पुन्हा कार्ड स्वाइप करून तुमच्या बँकेतून कोणतीही माहिती मिळाली नाही तर आपण मंथली स्टेटमेंटनुसार, माहिती गोळा करू शकता. म्हणून बँकेतून आलेल्या सतर्कांकडे लक्ष द्या आणि वेळोवेळी याकडे लक्ष देत रहा.