EPF Balance : घरबसल्या मिनिटात जाणून घेवू शकता पीएफ खात्यात जमा रक्कम, जाणून घ्या कशी आहे स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने आपल्या सबस्क्रायबर्सच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये आर्थिक वर्ष 2019-20 चे व्याज क्रेडिट करण्यास सुरूवात केली आहे. कोविड-19 संकट असूनही ईपीएफओ आपल्या अंशधारकांच्या खात्यात 8.5 टक्केच्या दराने व्याज क्रेडिट करत आहे. यामुळे सहा कोटीपेक्षा जास्त ईपीएफओ सबस्क्रायबर्सला फायदा होईल. जर तुम्ही सुद्धा वेतनधारक असाल आणि व्याजाची रक्कम आल्यानंतर तुमच्या ईपीएफ खात्यात जमा रक्कम किती झाली आहे हे जाणून घ्यायचे असेल तर बॅलन्स चेक करू शकता. तसेच पासबुकद्वारे संपूर्ण हिशेब पाहू शकता.
तुम्ही मिस्ड कॉल, एसएमएस, यूनिफाईड मेम्बर पोर्टल आणि ईपीएफओ वेबसाइटद्वारे ही माहिती मिळवू शकता. या वेगवेगळ्या पद्धतींनी बॅलन्स चेक करता येऊ शकतो.
1. SMS द्वारे
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
10 भाषांमध्ये मिळेल एसएमएस सेवा
एसएमएसद्वारे आपण 10 भाषांमध्ये आपल्या पीएफ अकाऊंटची माहिती मिळवू शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला मराठीत माहिती हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला EPFOHO UAN MAR टाइप करावे लागेल आणि त्यानंतर 7738299899 वर मॅसेज पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून त्याच भाषेमध्ये एक मॅसेज येईल ज्यामध्ये तुमची सर्व डिटेल्स असेल. तर इंग्रजीत जाणून घेण्यासाठी कोणताही कोड टाइप करावा लागणार नाही.
या भाषांसाठी हे कोड टाइप करा
हिंदी – HIN
पंजाबी – PUN
गुजराती – GUJ
मराठी – MAR
कन्नड – KAN
तेलगु – TEL
तमिळ – TAM
मल्याळम – MAL
बंगाली – BEN
2. मिस्ड कॉलद्वारे
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901046 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.
3. उमंग अॅपच्या माध्यमातून
प्ले स्टोर वरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हिस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
4. ईपीएफओच्या मेंबर पासबुकच्या वेबसाइटद्वारे
यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा. आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करून पासबुक चेक करू शकता.