Credit Score चांगला ठेवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, होईल खुप फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक आणि अर्थिक कंपन्या लोन देण्यापूर्वी ग्राहकाच्या क्रेडिट स्कोरला खुप महत्व देतात. चांगले क्रेडिट स्कोर असणार्‍या ग्राहकाला कर्ज सहज उपलब्ध होते. यासाठी एक चांगला क्रेडिट स्कोर असणे आवश्यक असते. हे तसे अवघड काम नाही. काही गोष्टी लक्षात घेऊन हे करणे सोपे आहे. जाणून घेवूयात कशा पद्धतीने एक चांगला क्रेडिट स्कोर ठेवता येईल.

1 नियमित चेक करा क्रेडिट रिपोर्ट
नियमित क्रेडिट रिपोर्ट चेक करणे एक चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल किंवा तुम्ही एखादे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला हे केलेच पाहिजे. कमीत कमी तीन महिन्यांतून एकदा तरी प्रत्येकाने क्रेडिट रिपोर्ट चेक केला पाहिजे. याचा फायदा हा होईल की, जर तुमचा क्रेडिट रिपोर्ट कमी होत असेल, तर तुम्हाला हे वेळीच समजेल आणि याची कारणे शोधून तुम्ही मार्ग काढू शकता.

2 पैसे योग्यवेळी भरा
व्यक्तीला आपले देणे योग्यवेळी पूर्ण केले पाहिजे. एका चांगल्या के्रडिट स्कोरसाठी हे खुप आवश्यक आहे. यासाठी ग्राहकाला आपले क्रेडिट कार्ड पेमेंट आणि आपले मासिक ईएमआयचे पेमेंट नेहमी वेळेवर केले पाहिजे. यामुळे क्रेडिट स्कोर नेहमी चांगला राहील. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे देणे आणि ईएमआय भरणे हे काम ऑटो मोडमध्ये सुद्धा टाकू शकता, यामुळे कोणत्याही मानवी चूकीशिवाय देणे रक्कम वेळेवर जमा केली जाईल.

3 क्रेडिट लाईन मेंटेन करा
व्यक्तीची क्रेडिट लाईन जेवढी जुनी होईल, क्रेडिट स्कोर तेवढा चांगला होईल. जर एखादा ग्राहक मोठ्या कालावधीपासून क्रेडिट कार्डचा वापर करत आहे किंवा जुने होम लोन असेल, तर हे तुमच्या क्रेडिट कार्डसाठी चांगले ठरू शकते. जर तुम्ही वेळेवर पैसे भरत असाल तर तुम्हाला एक मोठी क्रेडिट लाईन ठेवावी लागेल. आपल्या जुन्या के्रडिट कार्डला शक्यतो बंद करू नका. हे बंद केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोरमध्ये थोडा फरक पडू शकतो.

4 सेटलमेंट करू नका
लोनमध्ये ग्राहकाने सेटलमेंट पर्याय निवडण्यापासून दूर राहिले पाहिजे. हा पर्याय केवळ तेव्हाच निवडला पाहिजे, जेव्हा तुम्ही लोन चुकवण्याच्या स्थितीत अजिबात नाही. सेटलमेंट निवडल्याने ग्राहकाचा क्रेडिट स्कोर मोठ्या कालावधीसाठी प्रभावित राहू शकतो.

5 सीयूआर करा कमी
सीयूआर म्हणजे क्रेडिट युटिलायजेशन रेशीयो सुद्धा क्रेडिट स्कोरच्या दृष्टीने महत्वाचा आहे. व्यक्तीने आपल्या क्रेडिट कार्डवर सीयूआर कमी ठेवला पाहिजे. सीयूआर 20 ते 30 टक्केच्या दरम्यान ठेवणे चांगले असते.