खुशखबर ! सलग दुसर्‍या दिवशी सोनं झालं ‘स्वस्त’, चांदीच्या दरात देखील ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीला सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हाजिर बाजारात सोन्याच्या किंमती लागोपाठ दुसऱ्या दिवशी घटल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत सोन्यांच्या किंमती 145 रुपयांनी घसरल्या, त्यामुळे सोने 38,295 प्रति 10 ग्रॅम झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार जागतिक बाजारातील मंदी आणि रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली.

गुरुवारी दिल्लीतमध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती 105 रुपयांनी कमी होऊन 38,985 रुपये झाले होते, तर बुधवारी सोने 39,090 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ अ‍ॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक मंदी आणि रुपयात मजबूती यामुळे दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 145 रुपयांनी कमी होऊन 38,925 रुपये झाले. दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी मजबूत होता.

चांदीच्या किंमती शुक्रवारी घसरल्या, 1 किलोमागे चांदीची किंमत 315 रुपयांनी घसरुन 46,325 रुपये झाली, तर गुरुवारी चांदीच्या दरात 509 रुपयांची वाढ झाली होती, त्यामुळे चांदी 46,809 रुपये झाली होती. या आठवड्यात बुधवारी चांदी 46,300 प्रति किलोवर स्थिरावली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात घसरणं होऊन 1,488 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 17.46 डॉलर प्रति औंस स्तरावर होती. पटेल म्हणाले की ब्रेक्जिट डील झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट होऊ शकते.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या