नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक कामामध्ये आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता पडते. पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधी एक फॉर्म भरून पंधरा दिवस वाट पहावी लागत असे मात्र आता तुम्ही तत्काळ ई पॅन मिळवू शकता. हे पॅनकार्ड डिजिटल स्वरूपातील असेल. ई पॅन मिळवण्यासाठी आधार नंबर लागतो.
कसा करावा लागले अर्ज
ई पॅन साठी https://www.pan.utiitsl.com/PAN/newA.do या लिंक द्वारे अर्ज करावा लागेल. सगळ्यात आधी नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करा (फॉर्म 49 ए) पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ई पॅन मिळवण्यासाठी ‘डिजिटल मोड’वर क्लिक करा. यासाठी कागदपत्रांची हार्ड कॉपी लगेच देण्याची गरज नाही. यामध्ये ई हस्ताक्षराच्या माध्यमातून अर्ज करता येईल. आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडला गेलेला असला पाहिजे कारण यावेळी मोबाईलवर ओटीपी येऊ शकतो.
यासाठी अर्ज करताना कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज नाही. आधार मधील माहितीचा वापर करून ई पॅन कार्ड काढता येते. स्वाक्षरी आणि एक फोटो यावेळी अपलोड करावा लागणार आहे. ई पॅन मिळवण्यासाठी आधार खूप महत्वाचे आहे त्यामुळे आधारावरील माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या. जर दोन्हीमध्ये काही तफावत आढळली तर तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
अर्ज करताना पॅन कार्डची हार्ड कॉपी पाहिजे की ई पॅन कार्ड पाहिजे या बाबतचा पर्याय निवडता येऊ शकतो. जर दोनीही पर्याय निवडले तर 107 रुपये शुल्क आकारला जातो. परंतु केवळ ई पॅन कार्ड साठी 66 रुपये शुल्क भरावा लागेल.
Visit : Policenama.com
- नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास