E-Aadhaar Card Download : ‘आधार’कार्ड हरवलंय तर मग ‘नो-टेन्शन’, घरबसल्या काढू शकता त्याची ‘डिजीटल’ कॉपी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील कोणत्याही व्यक्तीला विविध योजनांचा आणि अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड खूप आवश्यक असते. म्हणून प्रत्येकासाठी हे महत्वाचे आहे, अशा परिस्थितीत जर आपले आधार कार्ड हरवले असेल तर आपण निराश होवू नका. यासाठी आपण काही प्रक्रिया पूर्ण करून काही मिनिटांतच आपल्या आधार कार्डची डिजिटल प्रत मिळवू शकता. यूनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आधार कार्ड धारकांना आणि त्यासाठी नोंदणी करणाऱ्यांना डिजिटल प्रती डाउनलोड करण्यास परवानगी देतो. आपण डाउनलोड केलेला आधार पोस्टद्वारे प्राप्त केलेला आधार तितकाच वैध आहे.

आधार कार्डची डिजिटल कॉपी कशी डाउनलोड करावी. जाणून घ्या

– UIDAI आधार पोर्टलवर लॉग-ऑन करा.

– आता ‘Get Aadhaar’ सेक्शनच्या अंतर्गत ‘Download Aadhaar’ च्या लिंकवर क्लिक करा.

– ‘Download Aadhaar’वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.

– या पेजवर आधार संख्या (UID),एकतर नोंदणी क्रमांक (EID) किंवा व्हर्च्युअल क्रमांक (VID) टाका.

– आता तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि ‘Send OTP’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– आता तुमच्या रजिस्टर मोबाईलवर 6 अंकी ओटीपी नंबर येईल.

– नवीन पेजवर, आपण ओटीपी टाका आणि क्विक सर्वेमध्ये काही प्रश्नांची उत्तरे देखील द्या.

– आता ‘Verify And Download’ या पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर आपल्या आधार कार्डची डिजिटल कॉपी डाउनलोड होईल.

आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी पासवर्ड सुरक्षित असते. आधार कार्डची डिजिटल कॉपी उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्डविषयी आपल्याला ‘Verify And Download’ खाली माहिती मिळेल. हा पासवर्ड आपल्या नावाची पहिली चार अक्षरे आणि नंतर आपल्या जन्माचे वर्ष असते.

आजकाल जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या कामात आधार कार्डची गरज पडते. मग यामध्ये खाजगी नोकरी असो की सरकारी नोकरी, आधार हा एक महत्त्वाचा कागदपत्र बनला आहे. अगदी बहुतेक सरकारी संस्थांमध्ये आधार कार्डही अनिवार्य केले गेले आहे.