मोबाईल ऍपच्या माध्यमातून कर्ज घेताय ? तर थांबा, आधी ‘हे’ वाचा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासते तेव्हा जर तुमच्याकडे पैसे नसतील तर कर्ज घ्यायला लागते. मग अनेकदा बरेचजण तातडीचा आधार म्हणून बँकेतून कर्ज घेतात तर काहीजण ऍपच्या माध्यमातून कर्ज घेतात. पण ऍपच्या माध्यमातून घेतलेले हेच कर्ज अडचणीचे ठरू शकते. त्याने मोठा आर्थिक फटका बसू शकतो. रिझर्व्ह बँकेकडूनही याबाबत सातत्याने सतर्क करण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारचे कर्ज घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

ऍपच्या माध्यमातून कर्ज घेताना कोणती काळजी घ्यावी, हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आता तुम्हाला आम्ही याबाबतचीम माहिती देणार आहोत.

कर्ज देणाऱ्याबाबत माहिती घ्यावी :
ज्याप्रकारे कर्जदार प्रत्येक अर्जासाठी Know Your Customers (KYC) करतात. त्यानुसारच, कर्जासाठी अर्ज करताना कर्ज देणाऱ्याची माहिती घ्यावी. तसेच त्या कंपन्या RBI सोबत रजिस्टर्ड आहे की नाही, याचीही माहिती घ्यावी.

वेबसाईट चेक करावी
अनेक अशा चीनी कंपन्या आहेत, त्यांची कोणतीही वेबसाईट नसते. त्यामुळे त्यांच्याकडून कर्ज घेणे धोक्याचे ठरू शकते. जर कोणतीही कंपनी लिस्टेट असेल तरीही ती RBI कडे रजिस्टर्ड आहे की नाही याची खात्री करावी. तसेच कंपनीचा ID नंबरही चेक करावा.

अधिकृत माहिती घ्यावी
लिगल लँडिंग ऍपची माहिती घेण्याचा आणखी एक पर्याय आहे. त्यानुसार, RBI रजिस्टर्ड NBFC शी संलग्न असणे. याशिवाय KYC आणि कलेक्शन प्रॅक्टिसच्या विविध नियामक दिशा-निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. जे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आले आहेत.